Header Ads

Header ADS

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने शिक्षण पूर्ण करावे-हर्षल सोनवणे सावदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

Students-must-complete-education-with-concentration-to-be-successful-annual-prize-distribution-ceremony-at-Harshal-Sonwane-Savda


 विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने शिक्षण पूर्ण करावे-हर्षल सोनवणे    

सावदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

लेवाजगत न्यूज सावदा - सावदा नगरपालिका संचलित असलेल्या श्री आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.

     यावेळी समारंभाचे अध्यक्ष सावदा नगरपरिषदचे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे तर सावदा पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले.

      याप्रसंगी वाघोदा येथील लोकनियुक्त सरपंच दिपाली चौधरी, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चौधरी, पालक शिक्षक संघाच्या कल्पना ठोसरे, श्रीकांत किशोर वाणी,शाम पाटील, राज चौधरी,प्रदीप कुलकर्णी,भानुदास भारंबे त्याचप्रमाणे पारितोषिकांचे दाते यशवंतराव बागुल सेवानिवृत्त शिक्षक अनिल  वाणी , कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, थोरगव्हाण येथील डी. एस. हायस्कूल चे मुख्याध्यापक वैष्णव,पर्यवेक्षक जे. व्ही. तायडे तसेच सर्व शिक्षक वृंद, व पत्रकार बांधव उपस्थित होते.

   यावेळी  सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे यांनी विद्यार्थ्यांना मेहनतीने आणि प्रामाणिकपणे आपले ध्येय साध्य करा असे आव्हान केले.

त्याचप्रमाणे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने शिक्षण पूर्ण करावे   तरच आपल्याला यशाचा मार्ग सुकर जाईल असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. यावेळी मान्यवरांच्या  शुभहस्ते विद्यार्थ्यांना दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शालेय पारितोषिक वितरणामध्ये ज्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतले अशा यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.

    पारितोषिक वाटप झाल्यानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या प्रसन्न विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे मनोगते व्यक्त करून आपापसातील भावना व्यक्त केल्या. शेवटी वंदे मातरम हे राष्ट्रगीत होऊन सदर समारंभ संपूर्ण झाला. प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक सी. सी. सपकाळे यांनी तर सुत्रसंचलन नंदू पाटील व संजय महाजन यांनी केले. तसेच समस्त शिक्षक वृन्दांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.