Header Ads

Header ADS

श्रीराम महाजन यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान : पुरस्काराची हॅट्रीक

Sriram-Mahajan's- Hattrick of Honorable-Teacher-Award


श्रीराम महाजन यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान : पुरस्काराची हॅट्रीक

उरण (सुनिल ठाकूर )चेंबूर कर्नाटका हायस्कूल, चेंबूर येथिल कलाशिक्षक श्रीराम साहेबराव महाजन यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आदर्श शिक्षक पुरस्काराची हॅट्रीक मारली आहे. १० फ्रेबुवारी २०२४ रोजी मुंबई मराठी अध्यापक संघ व जुनी पेन्शन संघर्ष समिती यांच संयुक्त विद्यमाने छबिलदास हायस्कूल, सभागृह दादर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे संतोष भणगे, सदानंद रावराणे, विनय राऊत.संजय पाटिल, हेमंत शिंदे. धनराज विसपुते, व आयोजक अनिल बोरनारे (अध्यक्ष मुंबई मराठी अध्यापक संघ, जुनि पेन्शन शिक्षक संघर्ष समिती, प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र) यांच्या प्रमुख उपस्थित सन्मानचिन्ह व  सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले, महाजन सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

 तसेच श्रीराम महाजन यांना हया शैक्षणिक वर्षात दैनिक बालेकिल्ला वृत्तपत्र मालेगांव व कांग्रेस शिक्षक सेल, आकोल यांनी सुद्धा सराना राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. महाजन यांना आतापर्यन्त विविध संस्थांकडून  ६८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

हे तिन्ही पुरस्कार माझे  विद्यार्थी, मित्र, परिवार यांच्या मुळे हा पुरस्कार मिळाला असे महाजन यांनी यावेळी बोलतांना सांगितले. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.