Header Ads

Header ADS

सावदा परिसरात घरफोडीचे सत्र चालूच;खिरोदा चिनावल येथे फोडली सात घरे

Seven-houses-were- burgled-in-Savada-area-in-Khiroda-Chinaval


सावदा परिसरात घरफोडीचे सत्र चालूच;खिरोदा चिनावल येथे फोडली सात घरे

लेवाजगत न्यूज सावदा- शहरासह परिसरात गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेले कुलूप बंद घरफोडीचे सत्र अजूनही कायम आहे शनिवारी  रात्री पुन्हा एकदा परिसरातील चिनवल येथील पाच बंद घरे व खिरोदा येथील दोन बंद घरे चोरट्यानी फोडली आहेत.

चिनवाल येथील  बाहेरगावी राहावयास असलेल्या ५ रहिवासीची बंद घरे चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही घरामध्ये चोरट्यांनी कपाट, लाँकर तोडत रोकड लाबवण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने यात काही हाती लागले नाही. तरी पण भर वस्तीत ही घरे फोडल्याने नागरिक भयभीत आहे. 

 चिनावल येथील प्लॅट एरियातील फोडलेली सर्व घर ही बंद होती घरमालक बाहेरगावी असल्याचा फायदा व चोरीत घबाड मिळण्या च्या आशेने चोरट्यांनी बंद घरांना लक्ष केले यात पत्रकार मिलिंद टोके, मिलिंद कुरकुरे, खेमचंद लोखंडे , चौधरी व अन्य१ जण हे सर्व बाहेर गावी असल्याने यांच्या घरांना चोरट्यानी लक्ष केल आहे.

 चिनावल येथे चोरट्यांचे हाती काही फारसे लागले नसले तरी खिरोदा येथील हरी नगर मधील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पितांबर महाजन यांच्या घराचे कुलूप कोयंडे तोडून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत चार तोळ्याची मंगल पोत, पाच ग्रॅम कानातील झुमके, एक तोळ्याची चैन, पंचवीस हजार रुपये कॅश अंदाजे चार लाखाचा एवज चोरट्यानी लंपास केला आहे.अजून एका दुसऱ्या घराचे घरमालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातील काय ऐवज हे मात्र कळू शकले नाही.

  महाजन हे एका नातलगाकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवसासाठी बाहेरगावी गेले होते. गेल्या दोन महिन्यात चोरट्यांनी सावदा परिसरात दहा ते पंधरा घरे फोडली आहेत. आजच्या घटनेमुळे चोरट्यांनी बंद घरे फोडण्याचे सत्र पुढे कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेने सावदा पोलीस सतर्क झाले असून सहाय्यक  पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी दिवसभरात घटनास्थळी तपास यंत्रणा गतिमान करण्याबरोबर लोकांना तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना करून बाहेरगावी गेल्यास घरात कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवू नये म्हणून  महिलांचे प्रबोधन केले आहे. दरम्यान चोरांचा सुगावा लागावा या दृष्टीने स्वयंपथक तसेच चोरांच्या हातांचे ठसे शोधण्यासाठी सावदा पोलिसांकडून सांगण्यात आले.

    सावदा शहरातही केल्या सहा महिन्या पासून तीन ते चार घरपोळ्या झाल्या असून त्याचाही अजून तपास लागलेला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.