Header Ads

Header ADS

खेलो इंडिया तायकवोंडो स्पर्धेसाठी रायगडच्या तीन खेळाडूंची निवड

Selection-of-three-players- from-Raigad-for-Khelo-India-Taekwondo-Competition


खेलो इंडिया तायकवोंडो स्पर्धेसाठी रायगडच्या तीन खेळाडूंची निवड

उरण ( सुनिल ठाकूर) :- भारतीय स्पोर्ट्स प्राधिकरण भारत युवा खेळ मंत्रालय व भारत सरकार आयोजित मुलींची खेलो इंडिया लीग राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्पेल्स पाँडिचरी येथे २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात रायगड तायकवोंडो असोशियनच्या पल्लवी अनिल म्हात्रे , निर्मिती दत्ता व सेजल दीपक मुसळे यांची खेळाडू म्हणून निवड झाली आहे प्रशिक्षक प्राजक्ता अंकोलेकर व या स्पर्धेसाठी पंच म्हणुन रेणुका केसाला ची निवड झाली आहे

             पल्लवी , निर्मिती व सेजल या रायगडाच्या खेळाडु असुन त्या अंतरराष्ट्रीय पंच व प्रमुख प्रशिक्षक सुभाष पाटील व सहायक प्रशिक्षक प्राजक्ता अंकोलेकर , अनिल म्हात्रे व तेजस माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तायकवोंडो खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत 

खेलो इंडिया तायकवोंडो स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पल्लवी , निर्मिती व सेजल यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन व कॉलेज च्या प्राचार्या कडुन अभिनंदन चा वर्षाव होत आहे 

             या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडु ९ मार्च ते ११ मार्च २०२४ रोजी जे येन इनडोअर स्टेडियम कटक ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी सहभागी होतील अशी माहिती तायकवोंडो फेडरेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर सुभाष पाटील यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.