Header Ads

Header ADS

सावदा येथे सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांचे पथसंचलन

 

Sawada-here-in-accordance-with-the-festival-of-the-police

सावदा येथे सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांचे पथसंचलन

लेवाजगत न्यूज सावदा : शिवजयंती आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांनी शहराच्या प्रमुख मार्गाने पथसंचलन केले. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच इतर सण उत्सव व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आज रविवारी (ता.११) शहरातील संवेदनशील ठिकाणे, मिश्र वस्ती, व गर्दीचे ठिकाणे व बाजारपट्टा भागातून संचलन करण्यात आले.या संचलनात सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक अमोल गर्जे, अनवर तडवी आदींसह १५ पोलिस अंमलदार तसेच राज्य राखीव बल गटाची तुकडी आदी सहभागी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.