Header Ads

Header ADS

सावदा येथील दिगंबर जैन मंदिर येथे श्री.मुनिसुव्रतनाथ भगवान यांच्या प्रतिमेचा साक्षात चमत्कार

 

Sāvadā-yēthīla-digambara-jaina-mandira-yēthē-śrī-munisuvratanātha-bhagavāna-yān̄chyā-pratimēchā-sākṣāta-chamatkāra

सावदा येथील दिगंबर जैन मंदिर येथे श्री.मुनिसुव्रतनाथ भगवान यांच्या प्रतिमेचा साक्षात चमत्कार

लेवाजगत न्यूज सावदा- येथील श्री चंद्रप्रभू व सहस्रकुट जिनालय दिगंबर जैन मंदिर सावदा येथे श्रमण मुनिश्री विशेषसागर जी महाराज यांच्या  प्रेरणेने व मार्गदर्शन मध्ये झालेल्या नूतन जीर्णोध्दार जैन मंदिरामध्ये येत्या २३ जानेवारी रोजी श्री मुनिसुव्रत भगवान  १५० वर्षे प्राचीन जिन प्रतिमा सकाळी अभिषेक च्या वेळेस पडल्यानंतर मानेपासून खंडित झाली सदर घटना नूतन पंचमंडळ अध्यक्ष डॉ.दिपक जैन, उपाध्यक्ष देवेंद्र अन्नदाते, सचिव श्री.विमलेश जैन, ट्रस्टी श्री. अभिजित मिटकर, योगेश जैन यांना दिनांक २४ जानेवारी दुसऱ्या दिवशी समजली घटना समजल्यानंतर ट्रस्टमंडळ यांनी तात्काळ जैन मुनि श्री विशेषसागर जी गुरुदेव यांच्या संघस्थ ब्रह्मचारी यांच्याशी फोनवर संपर्क साधून सदर घटनेची माहिती गुरुदेव श्री यांना दिली.

Sāvadā-yēthīla-digambara-jaina-mandira-yēthē-śrī-munisuvratanātha-bhagavāna-yān̄chyā-pratimēchā-sākṣāta-chamatkāra


     गुरुदेव श्री यांच्याकडून आदेश प्राप्त झाला की सर्व उपस्थित समाज बांधव यांनी तात्काळ नमोकार मंत्राची माळ जपा त्यानंतर मी आपणास कळवितो की आपल्याला सदर प्रतिमेबद्दल काय निर्णय घ्यायचे त्यावेळेस पंच कमिटीने गुरु आदेश येई पर्यंत उपवास धारण केला असता रात्री गुरुदेव श्री संघस्थ ब्रह्मचारी यांनी फोन वरती कळविले सदर प्रतिमा गुरुदेव श्री यांनी तूप व साखर मध्ये ठेवण्यास सांगितले आहे सदर कार्य मध्यप्रदेश येथील प्रतिष्ठाचार्य श्री संजयजी सरस चिचौली यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीमध्ये २७ जानेवारीला करण्यात आले गुरु आदेशाप्रमाणे खंडित प्रतिमा तूप साखर मध्ये ठेवून २१ दिवस भगवत आराधना व मंत्रजाप करण्यात आला येत्या १७ फेब्रुवारी रोजी २१ दिवस पूर्ण झाल्यानंतर गुरु आदेशाप्रमाणे श्री पंडितजी सरस यांच्या उपस्थितीत आणि गुरुदेव श्री विशेष सागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने सदर प्रतिमा तूप आणि साखर मधून बाहेर काढण्यात आली.तुपात साखरेत ठेवलेली प्रतिमा ही मानेपासून खंडित झालेली होती आणि बाहेर काढलेली प्रतिमा ही गुरुदेव श्री यांच्या आशीर्वादाने व पंडित संजय सरसजी यांचे सानिध्य मध्ये आणि उपस्थित सर्व भव्य पुण्यात्मा समाज बांधव  यांच्या आराधनेने व भक्तीने खंडित प्रतिमा स्वयमेव जुळून आली .प्रतिमेचे दर्शन सर्व सावदा जैन समाजास करण्याचे सौभाग्य लाभले. तसेच घडलेल्या घटनेचे वृत्त सजतात सर्व गाव गावं मधुन भक्त भाविक प्रभु दर्शनाचा लाभ घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.