Header Ads

Header ADS

सावदा येथे मोठा गाजावाजा करून भूमिपूजन झालेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन कार्यक्रमास नागरिकांचा विसर

Sāvadā-yēthē-mōṭhā-gājāvājā-karūna-bhūmipūjana-jhālēlyā-grāmīṇa-rugṇālayācē-udghāṭana-kāryakramāsa-nāgarikān̄cā-visara


सावदा येथे मोठा गाजावाजा करून भूमिपूजन झालेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन कार्यक्रमास  नागरिकांचा विसर 

लेवा जगत न्यूज सावदा - येथे ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनेदिनांक २५ रोजी सकाळी ११वाजता  होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालक मंत्री,मंत्री ,खासदार ,आमदार  व अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. या ग्रामीण रुग्णालयासाठी सावदा पालिकेने सव्वा ते दीड एकर जागा ग्रामीण रुग्णालय उभारण्या यासाठी मोफत दिली होती. हे मोफत दिल्यानंतर या ग्रामीण रुग्णालयाचे कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली या ग्रामीण रुग्णालयाचे  भूमिपूजन मोठ्या गाजावाजा करून तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते झाले होते.                      

        सावदा स्टेशन रोड लगत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन दिनांक २५ रोज सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने आहे. या उदघाटनाची पत्रिका अजून सावदा शहरातील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, सावदा पालिका व इतर पदाधिकाऱ्यांना या उद्घाटनाचा अजून पर्यंत थांगपत्ताही नाही. अशी परिस्थिती सावदा शहरातील व परिसरातील नागरिकांना प्रत्यय येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.