Header Ads

Header ADS

सावदा पालिकेची शेकडो वर्षाची उत्कृष्ट कामाची प्रतिमा अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त कामांमुळे खोळंबली निवडणूक कामी मिटिंगच्या वेळी अधिकारी गेल्याने सर्व विभाग बंद

Savada-municipality-hundreds-of-years-of-excellent-work-image-disturbed-due-to-extra-work-of-officers-during-election-work-meeting- all-departments-closed-by-officers-going


 सावदा पालिकेची शेकडो वर्षाची उत्कृष्ट कामाची प्रतिमा अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त कामांमुळे खोळंबली

निवडणूक कामी मिटिंगच्या वेळी अधिकारी गेल्याने सर्व विभाग बंद

लेवाजगत न्यूज सावदा-नगरपालिका मध्ये प्रभारी मुख्याधिकारी असल्याने पूर्ण वेळ देवू शकत नाही तसेच नगर परिषद अंतर्गत विविध विभागाच्या अधिकारी यांना अतिरिक्त पालिकांचे पदभार दिल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे तरी प्रशासनाने सावदा पालिकेत अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी शहर वासियाकडून होत आहे .

 पालिकेत  बांधकाम अभियंता,नगररचना विभाग अभियंता ,स्वच्छता निरीक्षक ,संगणक अभियंता, अग्निशमन अधिकारी हे अधिकारी पूर्ण वेळ नाहीत ,त्यामुळे त्या रिक्त असलेल्या पदाचा तात्पुरता पदभार दुसऱ्या अधिकारी कर्मचारी यांना दिलेला आहे ,त्यामुळे ज्यांना तो पदभार दिला जातो त्यांना त्यांच्या मूळ विभागातील तसेच मूळ नगरपालिकेचा कार्यभार सांभाळून कामकाज करावे लागत आहे.कोणतेही कर्मचारी यांना २-३  पालिका व विभागाचा पदभार ,तसेच २-३ कार्यालयांचा पदभार दिल्यानंतर ते एकाच वेळी  नेमकी कोणते कामकाज करतील हे पण आव्हान त्यांच्यासमोर असते.तसेच काही अत्यावश्यक कामे एकाच वेळेस आल्यास प्रत्येक वेळेस ते उपलब्ध होऊ शकतात का हा ही प्रश्न असतो.अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांची निवडणुका संदर्भात आदेश देण्यात येवू नये असे नमूद असले तरी सावदा नगर परिषद कार्यालयातील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी यांची निवडणुका कामी आदेश करण्यात आलेले आहे..वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशित केलेले आदेश हे पाळावेच लागतात ,तसेच वर नमुद केल्याप्रमाणे त्या पदावर पूर्ण वेळ अधिकारी कार्यरत असावा जेणेकरून तात्काळ सेवा शहवासीयांना भेटू शकते. 

      सध्या सावदा नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार रावेर नगर परिषद च्या मुख्याधिकारी स्वलीहा मालगावे यांच्याकडे असून सावदा नगरपरिषदेत विभाग प्रमुख म्हणून १३ पदे मंजूर असून त्यापैकी ५ पदे कार्यरत असून त्यापैकी लेखापाल विशाल पाटील यांच्याकडे भुसावळ नगरपालिकेचा , लेखापरीक्षक भारती पाटील यांच्याकडे रावेर नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार आहे ,तसेच कार्यालय अधीक्षक सचिन चोळके यांच्याकडे स्वच्छ्ता निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार आहे. विभागप्रमुख यांना एकतर दोन नगरपालिका आणि दोन विभाग तरी त्यांच्याकडे अतिरिक्त आहेत.तसेच महत्वाच्या असलेल्या सावदा नगर परिषद च्या बांधकाम अभियंता व नगर रचना विभाग अभियंता चां पदभार  उर्वरित ठिकाणच्या अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त  दिलेला आह त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना , रमाई घरकुल योजना ,नगर परिषद अंतर्गत विविध रस्ते ,गटारी, व शासनाच्या  विविध निधीतून होणारी कामे प्रलंबित आहेत,नागरिकांना बांधकाम परवानग्या ,विविध लेआऊट सबंधित कामे , पाणीपुरवठा सबंधित विविध कामे तसेच विविध ठिकाणचे नगरपरिषदेचे गाळे लिलाव प्रलंबित आहे.नागरिकांच्या दैनंदिन अडचणीचे निवारण होत नाही, त्यामुळे रिक्त पदे कधी भरतील याबाबतचा पत्रव्यवहार शासन दरबारी किंवा योग्य त्या यंत्रणेकडे नागरिक करू शकतात,तसेच नगरपरिषदेची विविध पदे कधी भरतील आणि पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी भेटेल ह्याची उत्सुकता शहरवासीयांना आहे.

 गेल्या आठ दिवसापासून निवडणूक कामासाठी पालिकेचे कर्मचारी यांना मीटिंग साठी बोलवण्यात येत असल्याने पालिकेत विविध विभागांमध्ये एकही कर्मचारी पालिकेत उपस्थित नव्हता पालिकेत नागरिक कामे घेऊन येत होती व पालिका बंद असल्याचे चित्र दिसत असल्याने माघारी परतत होती अशी परिस्थिती सध्या पालिका प्रशासनाची आहे याकडे माननीय जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे व परिस्थिती समजून घ्यावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमध्ये बोलली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.