Header Ads

Header ADS

सावदा ग्रामीण रुग्णालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण पण राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नाव न दिल्याने सावदा शहरातील नागरिकांत नाराजीचा सूर

 

Savada-Rural-Hospital-to-be-dedicated-by-the-hands-of-the-Prime-Minister-through-television-system-but-the-citizen-of-Savada-city-is-disgruntled-by-not-naming-the-Rajeshree-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Hospital-

सावदा ग्रामीण रुग्णालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण

पण राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नाव न दिल्याने सावदा शहरातील नागरिकांत नाराजीचा सूर

Savada-Rural-Hospital-to-be-dedicated-by-the-hands-of-the-Prime-Minister-through-television-system-but-the-citizen-of-Savada-city-is-disgruntled-by-not-naming-the-Rajeshree-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Hospital-

          (फोटो-पालिका ठरावाची प्रत)

लेवाजगत न्यूज सावदा- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा तालुका रावेर जिल्हा जळगांव येथे नवीन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे  उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार संध्याकाळी ४ वाजून ४५मिनिटांनी  होणार आहे. या रुग्णालयास सावदा पालिकेने जागा देताना प्रस्तावित रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हेच नाव द्यावे असा ठराव संमत करून हे जागा ग्रामीण रुग्णालया करिता दिली होती. ते नाव न दिल्याने शहरातील नागरिकांमध्ये व लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

     जळगांव जिल्हयातील सावदा ता. रावेर येथे नविन ३० खाटांचे  ग्रामीण रुणालय सन २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.

सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत ३० खाटांची असून दोन मजली आहे. त्यात तळमल्याचे क्षेत्रफळ १८००० चौरस फुट एवढे आहे व पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ ११,३०० चौरस फुट असे एकुण २९,३०० चौरस फुटाची इमारत आहे. 


  तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच  डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत.

    अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण २४ असुन वर्ग-१ चे एक, वर्ग-२ चे तीन, वर्ग-३ चे आठ व वर्ग-४ चे १२ निवासस्थान आहे.


  अशाप्रकारे आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक बाबींचा समावेश करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.सावदा नगरपालिकेने विशेष ठराव करून दिनांक ३१ जुलै २०१० रोजी पालिकेच्या राजश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची १.१५ आर एवढे क्षेत्रफळ असलेली जागा गट नंबर १४७०,१४७२,१४७३ नगरपालिका अधिनियमानुसार ग्रामीण रुग्णालयाला मोफत दिली होती. त्यावेळी तत्कालीन नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी व चंद्रशेखर शिवराम पाटील यांनी प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नाव द्यावे असा ठराव  केला होता. परंतु रविवारी होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या पूर्व संध्येस रुग्णालयावर हे प्रस्तावित नाव देण्यात आले नसल्याने सावदा शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.