Header Ads

Header ADS

सैनिक कल्याण विभागांतर्गत गट 'क' पदांच्या सरळसेवा भरतीसाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

सैनिक कल्याण विभागांतर्गत गट 'क' पदांच्या सरळसेवा भरतीसाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन


 लेवाजगत न्युज पुणे, दि. १४ : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट 'क' संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्याची प्रक्रिया टीसीएस, आयओएन कंपन्यामार्फत सूरू झाली असून माजी सैनिकांनी  त्यांचे अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. 

 

या भरती प्रक्रियेत गट 'क' संवर्गातील  कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-१ ही पदे  फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका गट-क-१ हे पद भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकाच्या पत्नीसाठी आरक्षित आहे. मृत सैनिकाच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी यांच्याकडून हे पद भरण्यात येईल. वरील पदांपैकी १ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.


या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने ३ मार्च रोजी सायं. ६ वाजेपर्यंत  स्वीकारण्यात येतील.  त्यानंतर संकेतस्थळ बंद होईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी कळविले आहे.

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.