Header Ads

Header ADS

रयत शिक्षण संस्था म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ-उत्तम कांबळे

 

Ryat-Education-Institute-namely-University-of-rites-excellent- Kamble

रयत शिक्षण संस्था म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ-उत्तम कांबळे

उरण( सुनिल ठाकूर )येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये वीर वाजे कर यांची पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ वृत्त समूहाचे माजी मुख्य संपादक, 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक व विचारवंत  उत्तम कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. वीर वाजेकर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असतानाच उत्तम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपल्या आयुष्यातील खडतर प्रसंग व त्यावर जिद्दीने मात करीत मिळवलेले यश सविस्तर निवेदन केले, याप्रसंगी उत्तम कांबळे म्हणाले की मी आज जो काही आहे त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा मोठा वाटा आहे, कॉलेजमध्ये शिकत असताना कमवा आणि शिका या योजनेमुळे मला शिक्षण घेणे शक्य झाले. कोल्हापुरातील शाहू कॉलेजमध्ये त्या वेळच्या प्राचार्यांनी मी त्या कॉलेजचा विद्यार्थी नसतानाही दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली त्यामुळे रयतेचा खरा विचार मला समजला, एन डी पाटील, गोविंद पानसरे, आर डी गायकवाड या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले, त्याला मराठी भाषा मोठ्या मुश्किलीने शिकता आली मला मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता आले त्यामुळे अशक्य असे काहीच नसते, प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ओळख स्वतः निर्माण केली पाहिजे प्रत्येकाला आपला चेहरा शोधता आला पाहिजे, अनेक मार्मिक दृष्टांत, मनोवेधक गोष्टी, मराठी कविता आणि उर्दू शेरोशायरीच्या सहाय्याने माननीय  उत्तम कांबळे मार्गदर्शन उलगडत नेले आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्यासोबत मंत्रमुग्ध करून ठेवले. याप्रसंगी सर्व गुणवंत प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व सांस्कृतिक स्पर्धा मध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माननीय  बाळाराम पाटील यांनी फोन वरून आपल्या शुभेच्छा कळवल्या,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉक्टर प्रल्हाद पवार यांनी केले, महाविद्यालयाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा कार्याध्यक्ष श्रीकांत गोतपागर यांनी घेतला, पारितोषिक वितरणाचे वाचन आचार्य डॉक्टर विलास महाले, राहुल पाटील, डॉक्टर श्रेया पाटील यांनी केले.

तुकाराम हरी वाजेकर विद्यालयाचे प्राचार्य श्री एम जी म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी स्कूल कमिटी चेअरमन  कृष्णाजी कडू, मीनाक्षी म्हात्रे,प्रभाकर (काका) कडू, श्री. रवीशेठ वाजे कर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुजाता पाटील व डॉक्टर श्रेया पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल ठक्कर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.