Header Ads

Header ADS

पुनित बालन ग्रुपचा पाठबळ असलेली भारती खेळाडू आरती पाटील पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२४ साठी पात्र

Punit-Balan-Group-backed-Bharti-player-Aarti-Patil-Qualifies-for-Para-Badminton-World-Championship-2024


पुनित बालन ग्रुपचा पाठबळ असलेली भारती खेळाडू आरती पाटील पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२४ साठी पात्र

लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आरती पाटील हिने दि. २० ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पटाया, थायलंड येथे होणाऱ्या बीडब्लूएफ पॅरा बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद २०२४ स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. आरती पाटील हिला पुनीत बालन ग्रुप ( पीबीजी) यांच्याकडून पाठबळ मिळत आहे. 

     कोल्हापूरची २३ वर्षीय रहिवाशी आरती पाटील ही SU5 जागतिक क्रमवारीत महिला एकेरीत सध्या १३व्या क्रमांकावर आहे.  

     खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आरतीने २०१७ च्या आशियाई युवा पॅरा स्पर्धेत मिश्र दुहेरीचे रौप्यपदक जिंकले होते आणि विविध आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन स्पर्धांमध्ये महिला एकेरी व दुहेरीत सात कांस्य पदके मिळवली आहेत. 

      “पुनीत बालन ग्रुपचा विश्वास आहे की खेळाडूंच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक करून, आम्ही भारताच्या क्रीडा यशाच्या प्रवासात योगदान देतो. आरती पाटील ही एक अपवादात्मक प्रतिभा आहे. ती जागतिक स्तरावर स्पर्धा करत असताना, तिच्या आकांक्षांना बळ देताना आम्हाला आनंद होत आहे. मला विश्वास आहे की ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशाचे नाव लौकिक मिळवून देईल. मी तिला शुभेच्छा देतो,” असे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी म्हटले आहे.

      आरतीने यापूर्वी २०१९ मध्ये बीडब्लूएफ पॅरा बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला आहे.

“बीडब्लूएफ पॅरा बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद २०२४ साठी पात्र ठरल्याबद्दल मी रोमांचित आहे. माझ्या मनावरील आर्थिक ओझे कमी झाल्यामुळे, मला खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता आले. पुनीत सर आणि पुनित बालन ग्रुपने दिलेल्या उल्लेखनीय पाठिंब्याबद्दल मी खरच कृतज्ञ आहे. या पाठिंब्याने उच्च-स्तरीय कोचिंग आणि प्रगत प्रशिक्षण सुविधांसाठी दरवाजे उघडले आहेत, ज्यामुळे मी स्वतःसाठी निर्धारित केलेली सर्व उद्दिष्टे साध्य करण्यात मला मदत होईल,” अशी प्रतिक्रिया आरती हिने व्यक्त केली.

      भारतीय प्रतिभेचे पालनपोषण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना पुनीत बालन ग्रुपकडून पुढील तीन वर्षांसाठी आरतीला एकूण ३३ लाखांचे आर्थिक पाठबळ देत आहे. या समर्थनामुळे २०२४ च्या पॅरालिम्पिक खेळांसाठी आरतीच्या तयारीलाही बळ मिळाले आहे.

   नऊ स्पोर्टिंग लीगमध्ये गुंतवणूक करून आणि जवळपास ६० नवोदित भारतीय क्रीडा प्रतिभेचे समर्थन करून पीबीजी देशभरात आणि जागतिक स्तरावर क्रीडा उपक्रमांना पाठिंबा देण्यात आघाडीवर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.