Header Ads

Header ADS

सावदा शहरात रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ सावदा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आरोप

 

Plastic-rice in Savada-city-ration-shop-Savda-city-Shiv Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray-group's-accusation

सावदा शहरात रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ

 सावदा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आरोप

 लेवाजगत न्यूज सावदा- येथील एका  रेशन रेशन दुकानावरून एका पुरवठाधारकाने घरी तांदूळ आणले असून त्या तांदुळात चक्क प्लास्टिकचे तांदूळ असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाने केला आहे. हा तांदूळ तेरा नंबर वार्ड मध्ये आढळून आला असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

  शहरातील एका रेशन दुकानावरून ऐका गृहिणीने रेशन आणल्यानंतर घरी तांदूळ निचण्यासाठी बसल्यावर हा प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पदाधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. तांदुळात मिश्रित असल्याने प्लास्टिकचा तांदूळ सहजासहजी ओळखू येत नाहीये शिजण्यासाठी हा तांदूळ बराच वेळ घेत असल्याने व दातांनी चावून बघितल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर येणार असल्याचे समजते आहे. तरी संबंधित प्रकरणाची जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावदा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.