Header Ads

Header ADS

किन्ही केंद्रातील शिष्यवृत्ती सराव परीक्षावर्गाचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन


 किन्ही केंद्रातील शिष्यवृत्ती सराव परीक्षावर्गाचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन

लेवाजगत न्युज जळगाव:- जळगाव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये सराव पेपर वर्ग घेण्यात आले होते. सराव पेपर वर्ग मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी व 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन शिक्षण विभाग जिल्हा परिषद अजळगाव यांच्यामार्फत करण्यात आले आहे. आज पहिल्या टप्प्यातील शिष्यवृत्ती सराव परीक्षा 

जिल्हा परिषद केंद्र शाळा किन्ही येथे आयोजित करण्यात आली होती. शिष्यवृत्ती सराव परीक्षा हॉलचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे असे उद्घाटन प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी उद् गार  काढले. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी विद्यार्थ्यांकडून शाळेमध्ये शिक्षकांनी जास्तीत जास्त सराव पेपर सोडवून घ्यावे असे आवाहन सर्व शिक्षकांना केले.


 सदर कार्यक्रमाकरिता भुसावळ  तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी डी धाडी, केंद्रप्रमुख ज्ञानदेव चौधरी उपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी श्रीकृष्ण पाटील, सुनिता डोळे, प्रमोद गांधीले, रहीम सर, साजिद सर, मेघशाम सपकाळे, शारदा पाटील, मनीषा चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. सराव परीक्षे करता किन्ही केंद्रातील 37 पैकी 37 विद्यार्थी हजर होते. त्यात मराठी माध्यमाचे 27 व उर्दू माध्यमाचे दहा विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.