Header Ads

Header ADS

जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांची बदली नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक पदी महेश्वर रेड्डी

 

Jalgaon-District-Police- Superintendent-Transfer-New-District-Police-Post-Superintendent-Maheshwar- Reddy

जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांची बदली नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक पदी महेश्वर रेड्डी

लेवाजगत न्यूज जळगाव-जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकांची बदली नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक पदी महेश्वर रेड्डी.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असुन त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे.अवघ्या काही महिन्यातच एम. राजकुमार हे जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक पदी नियुक्ती झाली होती त्यांच्या बदलीने एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला उपस्थित होत आहेत त्यांच्या जागी एमसीव्हि महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांची सोलापुर येथिल जिल्हा पोलिस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .त्यांच्या जागेवर मुंबई येथील पोलीस उपायुक्त असलेले एम.सी. व्हि.महेश्वर रेड्डी यांची आता जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे मुख्य सचिव व्यंकटेश भट यांनी दिले आहेत.यांच्यासह चाळीसगाव येथील पोलिस अधिकारी रमेश चोपडे यांची बदली पुणे येथील ग्रामीण भागातील अप्पर पोलिस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या जागेवर मुंबई येथील सायबर पोलिस अधिक्षका कविता नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या पूर्व संध्येला या बदली प्रक्रिया करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.