Header Ads

Header ADS

जळगाव व भुसावळ येथून अयोध्यासाठी रेल्वे या दिवशी धावणार

Jaḷagāva-va-bhusāvaḷa-yēthūna- ayōdhyāsāṭhī-rēlvē-yā-divaśī-dhāvaṇāra


जळगाव व भुसावळ येथून अयोध्यासाठी रेल्वे या दिवशी धावणार

लेवाजगत न्यूज जळगाव -जळगावातून आठवडयात एक तर भुसावळातून तीन रेल्वे गाडया अयोध्येसाठी धावत आहेत. जळगावातून रेल्वे जाण्यासाठी सुमारे १५०४ किमी अंतर प्रवास करावा लागेल. साधारण तिकिट ६७५ रूपयांपर्यंत आहे. जळगावातून रेल्वे क्रमांक २२१०३ एलटीटी-अयोध्या ही दर सोमवारी सायंकाळी ७.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोहोचते. स्लीपरसाठी सुमारे ६७५ रूपये  तिकिट आहे. तसेच भुसावळातून रेल्वे क्रमांक १५१०२ छपरा एक्सप्रेस दर शुक्रवारी रात्री १२.२५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०.४८ वाजता अयोध्येला पोहोचते. सुमारे २ हजार किमीचा प्रवास करण्यासाठी हिला देखील तेवीस तास लागतील. रेल्वे क्रमांक २२१२९ तुलसी एक्सप्रेस ही दर मंगळवार आणि रविवारी असेल. भुसावळातून ही दुपारी १.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता अयोध्येला पोहचेल. हा १६६३ किमीचा प्रवास असेल. स्लीपरसाठी सुमारे ६९५ रूपयांपर्यंत तिकिट भाडे लागेल. तर रेल्वे क्रमांक २२१८३ साकेत एक्सप्रेस ही दर बुधवार, शनिवारी भुसावळातून - दुपारी १.१० वाजता निघेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.