Header Ads

Header ADS

धनाजी नाना महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्घाटन

Inauguration-of-self-reliant-youth-campaign-in-Dhanaji-Nana-Mahavidyalay


धनाजी नाना महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्घाटन

 लेवाजगत न्यूज फैजपुर:- विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर 'युवती सभा' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आत्मनिर्भर युवती अभियानाला" दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात करण्यात आली आहे या अभियानात ७५ विद्यार्थिनींचा सहभाग होता कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्घाटन यावल कोर्टाच्या सरकारी वकील ऍड. सुलताना तडवी यांच्या हस्ते करण्यात आली, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुलींनी परिस्थितीनुसार शिक्षण घेणं म्हणजे आत्मनिर्भर होणे होय, मुलींना स्वतःची सर्व कामे स्वतः करता आली पाहिजे, येणाऱ्या परिस्थितीला सांभाळता येणे म्हणजे आत्मनिर्भर होणे होय, तसेच आजच्या पहिल्या सत्राच्या वक्त्या ऍड. तडवी मॅडम यांनी स्त्रियांसाठी असलेले कायदे त्यात अश्लील विरोधी कायदा २००५ चा कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा, स्वसंरक्षणाचा कायदा, संपत्तीत अधिकाराचा कायदा, महिलांसाठी असलेल्या अश्या अनेक कायद्यांची माहिती दिली प्रास्ताविक डॉ. जयश्री पाटील युवती सभाप्रमुख यांनी केले सूत्रसंचालन कु.नेहा पाटील व आभार कु.सुमय्या तडवी हिने मानले कार्यक्रमाला डॉ.राजश्री नेमाडे, डॉ. कल्पना पाटील डॉ.सरला तडवी डॉ.सीमा बारी प्रा. नाहीदा कुरेशी प्रा अदिती ढाके प्रा चेतना नेहते प्रा. कामिनी पाटील यांचे सहकार्य लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.