Header Ads

Header ADS

प्रेयसीचा विषप्राशनाने मृत्यु.....तर प्रियकरानचीही तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

 

Girlfriend's-death-by-poisoning-and-boyfriend's-suicide-by-jumping-into-the-hot-river

प्रेयसीचा विषप्राशनाने मृत्यु.....तर प्रियकरानचीही तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

लेवाजगत न्यूज भुसावळ-प्रेयसीचा विषप्राशनाने मृत्यु.....तर प्रियकराचीही तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे एका प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.प्रेयसीने विष प्राशन करून जीवन संपविल्याचे वृत्त प्रियकराला कळताच प्रियकराने तापी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली याबाबत भुसावळ येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहुल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव वय २३वर्षे व काजल गौतम सपकाळे वय २० वर्षे असे दोघे प्रेमी युगलांचे नाव आहे.मनोज भालेराव यांचे काजल सपकाळे या तरुणीवर प्रेम होते .दोघांनी लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता लवकरच दोघं विवाह बंधनात अडकणार होते शनिवार दिनांक ३ रोजी सकाळी किरकोळ वाद झाल्याने काजल सपकाळे हिने विष प्राशन केल्याने तिला तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र सायंकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास काजलचे निधन झाले.काजलचा मृत्यु झाला असल्याचे कुणाल भालेरावला कळताच त्याने तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले या घटनेने जळगाव जिल्ह्यासह भुसावळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.