Header Ads

Header ADS

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे संवाद लेखकाशी कार्यक्रम संपन्न




Faizpur-at-Dhanaji-Nana-College-at-interaction-with-the-author-event-completed

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय  येथे संवाद लेखकाशी, कार्यक्रम उत्साहात

लेवाजगत न्यूज फैजपूर: येथील  धनाजी रोजी धनाजी नाना महाविद्यालय येथे आज बुधवार रोजी  हिंदी विभागाच्या वतीने  "ऑनलाईन  संवाद  लेखक से"  हा कार्यक्रम  आयोजीत करण्यात आला  प्रमुख  वक्ता  म्हणून प्रसिद्ध हिंदी लेखिका  सुषमा  मुनीद्र यांनी   'मेरी बिटिया'  या कथेवर विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. मुलींच्या  जन्मानंतर परिवारात  समाजात  दुखद भूमिका घेतली जाते,  तिच्या जन्मा बरोबर हुंडा जमविण्याची चिंता तिचे आई वडील करतात काही वडील मुली जन्माला आल्या म्हणून मला काय करायचे आहे कमाई करून या भावनेने बेजाबदार पणे वडलोपर्जित  मिळकत उधळतात, मुलींना  मुलाप्रमाणे आपल्या वर्साची पंजी कमावून एक नवा आदर्श समाजात निर्माण करणारी मानस कमी झाली आहेत, मुलीच्या बापालाही तुला मुली आहेत काय करायचे तुला असे म्हणत नात्यात्यातील भावंडे, बहिणी त्यांची मुले हिस्सा मांगतात  आणि जाणून बुजून मुलींचा हाक्क हिरावला जातो, बाप ठामपणें सांगत नाही की मुली आहेत म्हणून माझी त्यांच्यासाठी जबाबदारी जास्त आहे, माझ्या मुलींना वाईट वाटू नये की आमच्यातला हिस्सा आमच्या बापाने केवळ आम्ही मुली आहोत म्हणून हिरावला आणि इतरांना वाटून दिला म्हणून बाप म्हणून त्यांचे हक्कांचे सिरक्षण करण्याची जबाबदारी मुलींच्या बापाची आहे, म्हणजेच मुलींना समाज समान मनेल तेंव्हा मानेल पण आधी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना समानता  प्राप्त करून द्यावी असे मत शुषमा मुनिंद्र यांनी मांडले अध्यक्ष उपप्राचार्य  डॉ. एस. व्ही जाधव होते, प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.कल्पना पाटील,  सुत्रसंचालन डॉ. विजय सोनजे व आभार  डॉ.सतीश  पाटील  यांनी मानले, कार्यक्रम  साठी प्राचार्य  डॉ राजेंद्र  वाघुळदे उपप्राचार्य डॉ . विलास बोरोले  यांचे  मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ.आय.पी. ठाकुर, प्रा. डॉ. राजश्री नेमाडे, डॉ. ताराचंद सावसाकळे, डॉ. सीमा बारी  प्रा.शिवाजी मगर , कॅप्टन राजेंद्र राजपूत,  डॉ.सागर धनगर, डॉ.दीपक सूर्यवंशी, प्रा.धिरज खैरे, प्रा. कामिनी पाटील यांनी सहकार्य केले. बहुसंख्य  विद्यार्थी  उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.