Header Ads

Header ADS

फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात स्त्री सक्षमीकरण विषयावर व्याख्यान

Faijapūra-yēthē-dhanājī-nānā- mahāvidyālayāta-strī-sakṣamīkaraṇa-viṣayāvara-vyākhyāna


फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात स्त्री सक्षमीकरण विषयावर व्याख्यान

लेवाजगत न्यूज फैजपूर: येथील  धनाजी नाना महाविद्यालय  येथे इतिहास विभागाद्वारे महिला सक्षमीकरणांमध्ये भारतीय समाजसुधारकांचे योगदान या विषयावर सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. साईनाथ उमरीवाड  यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

प्रा.साईनाथ उमरीवाड यांनी स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय?  हे सांगून राजा रामा मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान कशाप्रकारे प्राप्त करून दिला याचे अनेक उदाहरणे देऊन भारतातील वर्तमान स्थितीवर प्रकाश टाकला. महिलांच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून स्त्री-पुरुष असमानता नष्ट कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे सर यांनी  महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे . महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत त्यांना शिक्षणाची व रोजगाराची समान संधी प्रत्येकाच्या घराघरातून उपलब्ध करून देणे.  त्यासाठी सरकारच्या विविध धोरणांचा योग्य पद्धतीने स्वीकार करून घेणे आणि महिलांनी स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभे राहिले पाहिजे याबद्दलचे महत्त्व सांगितले. व्यासपीठावर उप प्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव प्रा.डी.बी.तायडे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. विजय सोनजे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.जगदीश खरात यांनी देशाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवरून होत असते डॉ.बाबासाहेबांच्या या मतावर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून विचार मांडले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ.मारोती जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्यासंखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.