Header Ads

Header ADS

डॉ. केतकी पाटील यांच्या पुढाकाराने लाल माती गावात आरोग्य शिबिर

Ḍr-kētakī-pāṭīla-yān̄chyā-puḍhākārānē-lālamātī-gāvāta-ārōgya śhibira




डॉ.केतकी पाटील यांच्या पुढाकाराने लाल माती गावात आरोग्य शिबीर

लेवाजगत न्यूज सावदा-भाजपने राबविलेल्या ‘गाव चलो अभियानां’तर्गत भाजपा महिला मोर्चा  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील लाल माती या गावात मुक्काम केला. त्यावेळी गावात आरोग्य सुविधा नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. केतकी पाटील यांनी तातडीने गावात आरोग्य शिबिर भरवून ग्रामस्थांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

भाजपने गेल्या आठवड्यात ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान गाव चलो अभियान राबविले. त्याअंतर्गत भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील दुर्गम लाल माती गावात प्रवास केला. या गावात कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा नव्हत्या. हे पाहून संवेदनशील असलेल्या डॉ. केतकी यांनी  गावातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लगेचच गोदावरी फाउंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. 

 यावेळी लाल माती येथील  दिनेश  पवार, अनिल पवार , योगेश धनगर, सुरेश पवार, राष्ट्रीय बंजारा तालुका अध्यक्ष प्रकाश  चव्हाण, गणेश पवार, हर्षल चव्हाण, भिमा पवार, किरण राठोड, अर्जुन जाधव, सतिश सावळे, कृष्णा चव्हाण पांडुरंग चव्हाण मुकेश चव्हाण निलेश पवार लखन पवार रवी पवार मिथुन चव्हाण भगवान जाधव भागिरथ पवार जगदिश पवार हर्षल पवार कृष्णा पवार किरण पवार, जगराम पवार आदींचे सहकार्य लाभले.

तपासणी व उपचार

शिबिरात ईसीजी  कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच कान नाक घसा, हाडांचे दुखणे, मणक्यांचे विकार, स्त्रियांचे आजार अशा विविध आजारांची तपासणी  करण्यात आली. यामुळे लाल माती ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यापुढे देखील ग्रामस्थांच्या मागणीनुसार वैद्यकीय सुविधा दिली जाईल, अशी ग्वाही डॉ केतकी पाटील यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.