Header Ads

Header ADS

जिल्हा परिषद शाळा गाते येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

District-Council-School-Sings-Here-Cultural-Programme-Completed


जिल्हा परिषद शाळा गाते येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

लेवाजगत न्यूज सावदा -येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळा गाते तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे नुकताच इयत्ता १ ते ४ चौथीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.  

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला  सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. 

     कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश प्रकाश तायडे यांची निवड केली गेली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ सारिका गणेश पाटील उपस्थित होत्या. तसेच   विलास चौधरी ग्रामपंचायत सदस्य,उषा खैरे सौ रिताबाई सुनील तायडे  शालेय  व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ राजकन्या राहुल तायडे, श्री कन्हैया पाटील, श्री जगदीश कोळी,सौ सुनिता तायडे, सौ दिपाली कोळी, सौ वैशाली ढीवरे आदी सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.

     या सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने श्रीमती विद्या रवींद्र चौधरी, श्री राजेंद्र बाजीराव तायडे, सौ माधुरी विजय चौधरी, श्री पंकज जिजाबराव पाटील यांनी मान्यवरांचा सत्कार व स्वागत केले.

    कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गीतांने झाली यावेळी पारंपारिक नृत्य देशभक्तीपर गीते दारूबंदी नाटिका लोकगीते यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी गावातील मोठ्या संख्येने पालक वर्ग ग्रामस्थ महिला तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक  केले तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना बक्षीस रूपाने ८५०० रुपये रक्कम मिळाली.

   विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेतून व्यसनामुळे होणारे नुकसान हानी यांचे महत्त्व मांडण्यात आले.

विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मंगळागौरच्या गीतातून पारंपारिक खेळ दाखविण्यात आले.

   अस्मिता अमोल चक्रे इयत्ता चौथी या विद्यार्थिनीचा वाढदिवस विद्यार्थ्यांना बिस्किट पुडे वाटून साजरा करण्यात आला.

   विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीमती विद्या रवींद्र चौधरी मॅडम,श्री राजेंद्र बाजीराव तायडे सर,सौ माधुरी विजय चौधरी मॅडम, श्री समाधान वना पाटील सर,श्री पंकज जिजाबराव पाटील सर. या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

   कार्यक्रमाला श्री सुधीर चौधरी,श्री संजय तायडे,श्री योगेश सोनवणे,श्री बंटी कोळी,श्री जयेश चौधरी,श्री किरण पाटील.श्री गिरीश पाटील,दुर्गेश कोळी आदींचे सहकार्य लाभले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माधुरी विजय चौधरी मॅडम यांनी केले कार्यक्रमाची शेवट आभार प्रदर्शन करून करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.