Header Ads

Header ADS

छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीचा जिवंत झरा- ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

 

Chhatrapati-Shivaji- Maharaj-living-spring-of-spontaneity-senior-social worker-Dr-Ravindra- Bhole

छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीचा जिवंत झरा- ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

लेवाजगत न्यूज उरुळी कांचन:-छत्रपती शिवाजी महाराज योगी पावन मनाचे, आणि जगाचे होते. सतराव्या शतकामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून महाराजांनी आपल्या डावपेच्याद्वारे कौशल्याद्वारे गनिमी कावा करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मात्र ते अद्वितीय शौर्यवान महान रणनीतीकार होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांच्या दरबारामध्ये सर्व धर्मीय व अठरापगड जातीचे लोक होते ,सैनिक होते. तद्वतच अठरापगड जातीतील सैनिकांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी सहकार्य केलेले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांना एका जातीमध्ये गुंफणे हा त्यांच्या कर्तुत्वाचा अपमान होईल. ज्यांना धर्माने वागायचे आहे,त्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज होते. राष्ट्र भक्तांना आजही शिवाजी महाराज स्फूर्तीचा जिवंत झरा आहे , असे वाटते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.कल्पतरू बाल मित्र मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉक्टर रवींद्र भोळे यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्याप्रसंगी डॉक्टर रवींद्र भोळे बोलत होते. तसेच अनेक ठिकाणी डॉ. रवींद्र भोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी तळवाडी येथील कल्पतरू मित्र मंडळाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.