Header Ads

Header ADS

हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज-श्रीराम सा. महाजन

Builders of Hindavi-Swarajya- Chhatrapati-Shivaji-Maharaj-Sriram-sa-Mahajan


 हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज-श्रीराम सा. महाजन

फाल्गुन वैद्य तृतीय शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० शिवनेरीच्या नगारखान्यात सनई,चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईच्या पोटी पुत्ररत्न जन्म झाला, तसेच किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर राजाचा जन्म झाला म्हणून बाळाचे नाव 'शिवाजी' असे ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांचे वडीलाचे नाव शहाजीराजे भोसले. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. शिवरायच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. त्यांना रामायण व महाभारत या गोष्टी सांगितल्या. शिवरायांना शूर व महापुरुषांच्या गोष्टी आवडत. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टी हि सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदर युक्त भावना निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांच्याबरोबर खेळायला येत. त्यांनी आणलेली चटणी भाकर व कांदा महाराज आवडीने खात असत.

 शहाजीराजे हे संस्कृत भाषेचे गाढे पंडित होते. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा शिक्षणाचा प्रारंभ झाला. वाचन, लेखन तसेच युद्ध कला या गोष्टी शिकवण्यासाठी महाराजांनी सराव केला. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, तलवार चालविणे, भाला फेकणे  इत्यादी युद्ध कला  शिकवण्यास प्रारंभ केल. वयाच्या बाराव्या वर्षापर्यत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. उत्तम राज्यकारभार कसा करावा. शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधवे. घोडे व हत्ती यांची परीक्षण कसे करावे. शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक कला शिवरायांना अवगत झाल्या होत्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला. शिवराय परक्यांची चाकरी करणार नाही, ते स्वतःच आपल्या लोकांसाठी राज्य निर्माण करतील असा विश्वास माँसाहेब होता. महाराज स्वराज्य स्थापन करतील, या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या.

 छत्रपती शिवरायांना सतत ध्यानी, मनी एकच स्वप्नं दिसत होते ते म्हणजे स्वराजच. आपण अन्यायाविरुद्ध लढावे, तसेच दुष्टांचा नाश करावा. तसेच प्रजेला सुखी करावे, व त्यांना न्याय द्यावा असे शिवरायांना सतत वाटू लागले. फलटणच्या नाईक निबांळकर यांची कन्या सईबाई बरोबर शिवबांचा विवाह मोठ्या थाटामाटाने जिजामातानी लावून दिले. शिवरायाच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरु झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र  राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा अशी प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुविश्ववंदिता।

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भप्राय राजते।

हि राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता.


रायरेश्वरच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान त्यांच्याविरुद्ध ब्र काढत्याची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायानी  स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या संवंगड्याचे अल्प बळ! पण शिवरायांनी निश्चय अढळ दिला नाही, त्यातूनच बळ निर्माण झाले. तानाजी मालुसरे व निवडक मावळ्यांना घेवून तोरणा किल्ला जिंकून शिवरायानी स्वराज्याचे  तोरण  बांधले. तोरणा किल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला.


किल्ल्याची दुरुस्ती करताना चार घागरी सोन्यांच्या मोहरांनी भरलेल्या सापडल्या, स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आई भवानी देवीचा आशीर्वाद आहे. असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी राजगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या किल्लात त्यांनी राजवाडा, बारामहाल. अठरा कारखाने आणि राजगादी तयार केली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी निर्माण केली. शिवरायांची घोडदौड सुरु झाली. आपल्या मावळ्यांना घेवून अनेक किल्ले ताब्यात घेतले. कोंढाणा आणि पुरंदर ही किल्ले काबीज केले. स्वराज्याची घौडदौड अशी जोरात सुरु झाली. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली. त्यांचे नाव दुमदुमले, शिवराय लोकांचे राजे झाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले. भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला. त्यांचे नाव ठेवले प्रतापगड.


शिवरायांनी अफजलखान अत्यंत  चपळाईने ठार केले. खानाच्या फौजेया धुबा उडवला. विजापूरचा सर्वांत बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सहयाद्रीच्या  कडेकपारीतून घुमू लागले. अफजल खान्याच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्यांच्या मागोमाग शिवरायांनी पन्हाळगड जिंकला. बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यांसाठी धारातीर्थी पडले, बाजीप्रभू देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामिनिष्ठाच्या या रक्ताने घोडखिंड पावन झाली. धन्य तो

वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू!

शाहिस्ताखानाची चार बोटे छाटून मुघल सतेला पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. साऱ्या महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात, तोच सन १६६४ मध्ये शहाजीराजे यांचे निधन झाले. शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.


१६६६ मध्ये  मोठ्या युक्तीन बादशाहाच्या हातावर तुरी देवून शिवरायांनी आपली सुटका करून घेतली. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणाचा हा किल्ला जिंकला, पण गड सर करतांना तानाजी धारातीर्थी पडला. गड आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले "गड आला पण सिंह गेला!"

बाजीप्रभु, मुरारबाजी, तानाजी इ.स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राणाची आहुती दिली. शेवटी स्वराज्य उभी राहिले. शत्रूवर वचक बसला.


'या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता दयावी. म्हणून शिवरायांनी राज्यभिषेकाची योजना आखली. सर्व धर्माना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात  निर्माण झाला होता. खराज्य निर्माण झाल आहे हे जगाला कळायला हवे. म्हणून शिवरायांनी राज्यभिषेक करून घेण्याचे ठरविले. शिवरायांनी राजधानीसाठी राजगडाची निवड केली. शिवरायांनी सोन्याचे व मोल्यवान रत्नानी सिहासन तयार करून घेतले. गंगाभटांनी सोन्यामोत्यांच्या झालरीच छत्र महाराजाच्या डोक्यावर धरले व ते मोठ्यान म्हणाले क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो, सर्वांनी जय जयकार केला. गडावाडांवर तोफा वाजल्या. सर्व  शिवरायांचा जयजयकार झाला: अशा प्रकारे  सन १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला.शिवरायांची कीर्ती सर्वत्र जगभर पसरली. राज्यभिषेकानंतर १७ जून १६७४ रोजी मासाहेब मृत्यू झाला. शिवरायाचा मोठा आधार

गेला. स्वराज्याच्या सर्व प्रजेचा आधार शिवराय होते. परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या   मार्गदर्शक व गुरु होत्या. शिवरायांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटमोठे किल्ले जिंकले. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारच किल्ले बांधले. शिवरायांकडे सुमारे ३०० किल्ले होते. पाश्चिम महाराष्ट्र, कोकण, सहयाद्री डोंगरांगापासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत  महाराजीनी राज्यव्याप्ती वाढवली होती. दि. ३ एप्रिल १६८० सर्वांना दुःखसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. रयतेचा वाली गेला. शत्रूला  नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य  निर्माण केले. भारतात महाराजांच्या कार्याला व शौर्याला तोड नव्हती . महाराज थोर राष्ट्रपुरुष होते. शिवरायांमध्ये आदर्श पुत्र , सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिंमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाच कितीतरी तेजस्वी पैलू आहेत, हे सारे पाहिले, की पुन्हापुन्हा वाटते

 शिवरायांचा आठवावा  रुप! शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ।।

श्रीराम सा. महाजन (कलाशिक्षक) चेंबूर कर्नाटका हायस्कूल. चेंबूर मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.