Header Ads

Header ADS

भक्तीचे-मैत्रीचे शीतकालीन उबदार स्नेहमिलन. एस.एस.सी. बॅच १९९० दिघोडे हायस्कुल चे स्नेह मिलन आनंदात संपन्न

 

Bhakti-friendship-winter-warm-romance-S-S-C-Batch-1990-Dighode-high-school-love- union-blissfully

भक्तीचे-मैत्रीचे शीतकालीन उबदार स्नेहमिलन.

एस.एस.सी. बॅच १९९० दिघोडे हायस्कुल चे स्नेह मिलन आनंदात संपन्न

लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )अगदी पहाटे पहाटे "ॐ मित्राय नम:" असा श्रीसूर्यदेवाला नमस्कार करुन "मित्रमैत्रिणींचा" एकत्रित ग्रुप विंधणे-दिघोडे येथून प्रवासासाठी निघाला. नाशिक येथे  वर्ग मैत्रीण सौ. सुनिता तावडे यांच्या घरी सकाळी ११ वाजता पोहोचुन स्थानपन्न झाला. चहा पाणी पाहुणचार झाला. सौ. सुनिताने आलेल्या सर्व मैत्रिणींचे हळदी कुंकु करुन त्यांना साडी चे "वाण" सप्रेम भेंट दिले. सौ. सुनिता तावडे हिचे पती सर्कल ऑफिसर या प्रतिष्ठेच्या पदावरील श्री. प्रकाश तावडे यांचा SSC बॅच १९९० तर्फे शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. नंतर सर्वांनी श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर जाऊन सप्तशृंगी निवासिनी (सप्त म्हणजे सात आणि श्रुंग म्हणजे शिखरे) जगन्माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी "गाईड" च्या भुमीकेतुन सौ. सुनिता तावडे यांनी सर्वांना सप्तशृंगी देवीचा महिमा सांगून या परिसराची माहिती दिली आणि इतर महत्वाची ठिकाणे यांचीही माहिती दिली. देवीचे दर्शन घेऊन गडाच्या खाली आल्यावर यावेळी संजीवनी चोरघे, जयश्री पाटील, उषा म्हात्रे, संदिप माळी, सतीश कोळी, नरेश पाटील, यांच्या मोलाचे सहकार्याने आणि कैलास पिंपरे, कांता भोईर, दिपक पाटील, दिपक ठाकूर, कैलास ठाकूर, कैलास पाटील या सर्वांनी हातभार लावून एकत्रित स्वयंपाक तयार करून मग स्नेह भोजनाचा आनंद व आस्वाद घेतला. यावेळी गायक कलाकार मित्र प्रमोद म्हात्रे यांच्या गोड आवाजा ने सर्वांची मने जिंकली तर सुनिता तावडे, कांचन पिंपरे, संगीता पाटील यांनी शाळेतील मुलींची वेशभूषा करून शाळेतील आठवणीना उजाळा दिला. या संपूर्ण गेट टुगेदर चे निटनेटके नियोजन पत्रकार मित्र सुनिल ठाकूर यांनी तर प्रासंगिक शानदार निवेदन आशिष ठाकूर यांनी केले व शेवटी आभारप्रदर्शन  बळीराम पाटील यांनी मानले. शीतकालीन गोड गुलाबी थंडीमध्ये नाशिक क्षेत्री श्रीसप्तशृंगी देवीच्या पवित्र भक्तीत न्हावून पुढील जीवनासाठी मैत्रीच्या उबदार एनर्जेटीक स्नेहभेटीचे संजीवन टाॅनिक घेवून चिमणपाखरे आपापल्या संसाराच्या घरट्यात परतली स्मृतींच्या अल्बममध्ये एक "आठवण" "साठवण" करत.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.