Header Ads

Header ADS

बामणोद येथिल श्री.पी. एस.एम.स्कूलच्या १९७०-७१ एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात

 

Bamanod-Yethil-Sri-P-SM-School-1970-71- SSC-Batch-Students-Reunion-Excited

बामणोद येथिल श्री.पी. एस.एम.स्कूलच्या १९७०-७१ एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात

लेवाजगत न्यूज बामनोद -येथिल श्री.पी. एस. एम.स्कूल च्या १९७०-७१ एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन नुकतेच म्हैसवाडी (बामणोद) येथे श्री. वासुदेव चौधरी यांच्या फार्म हाऊस वर संपन्न झाले.

सदर संमेलनाला ७०-७१ च्या बॅचचे व वयाने पण ७०,७१,७२ री चे ३२ विद्यार्थी-आजोबा सपत्नीक उपस्थित होते. 

     गुरूवर्य द्वय श्री. विष्णू हरी जावळे व सौ.जाईबाई विष्णू जावळे या वर्गाचे वर्ग शिक्षक म्हणून आनंदाने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात श्रीगणेश पूजन, आराधना व भावगीतांनी झाली. या वेळी महिलांच्या संगीत खुर्चीने   मनोरंजनात रंगत भरली.

    श्री. व सौ. वासुदेव चौधरी यांनी श्री विष्णू जावळे सरांचे सपत्नीक स्वागत व सत्कार केला.

महिलांच्या हळद कुंकवा बरोबरच पुरूष मित्रांना पण टिळा लावून तिळगुळ,गुलाब पुष्प व भेटवस्तू (वाण) देऊन आनंद लुटला.

   सर्व मित्रांनी ५०-५४ वर्षां नंतर भेटत असल्या मुळे हसत खेळत, जुन्या आठवणींना उजाळा देत ओळख परिचयही केला.

   सदर प्रसंगी श्री. व सौ. वासुदेव चौधरी, आणि उद्योजक श्री. व सौ. सोपान येवले यांचे  सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रम पार पडण्या साठी महत्वाचा वाटा उचलण्या कारणी श्री. व सौ. विजय झांबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगाची आठवण रहावी म्हणून चिठ्ठ्या टाकून नशिबवान (lucky) पुरूष व महिले ची निवड करून त्यांना उबदार भेट वस्तू देण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन श्री. विजय झांबरे व गोविंदा वाघुळदे यांनी शाळेतील गमतीदार व भावनीक किस्से सांगत सर्वांना शाळेतील भूतकाळात नेऊन रंगत भरली.

असे हे संमेलन पार पाडण्या साठी विजय झांबरे, गोविंदा वाघुळदे, वासुदेव चौधरी, सोपान येवले, डाॅ. जे. डी. भंगाळे, प्रभाकर कोल्हे भानु वाघुळदे व सर्व वर्ग मित्रांनी सहयोग केला.

एकमेकांना शुभेच्छा देत, ७५ री साजरी करण्या साठी पुन्हा एकत्र येऊ, अशा भावना व्यक्त करीत भावना विवश होऊन एकमेकांचे निरोप घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.