Header Ads

Header ADS

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. रवींद्र भोळे यांना दलित पॅंथर सन्मानचिन्ह प्रदान

Ārōgya-kṣētrātīla-ullēkhanīya- kāryābaddala-ḍŏ-ravīndra-bhōḷē-yānnā- dalita-pĕnthara-sanmānacinha-pradāna


आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. रवींद्र भोळे यांना दलित पॅंथर सन्मानचिन्ह प्रदान

लेवाजगत न्यूज हडपसर पुणे: सामाजिक, अध्यात्मिक,वैद्यकीय, अंधश्रद्धा निर्मूलन , शैक्षणीक, प्रवचनाद्वारे प्रबोधन ,व्यसनमुक्ती इत्यादी क्षेत्रांत समर्पित भावनेने  डॉ. रवींद्र भोळे यांनी कार्ये केलेली आहेत. तसेच मराठवाडा भूकंपात वैद्यकीय सेवा, उरळी कांचन गॅस्ट्रोसाथीतवैदयकिय मोफत सेवा,दुष्काळ असताना पुरंदर मध्ये पूर्व भागात अत्यल्प दरात वैद्यकीय सेवाडॉ.रवींद्र भोळे यांनी केलेली आहे.तसेच गेली ३५ वर्षे पासून डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे उरुळी कांचन येथे शेतमजूर, कामगार ,कष्टकरी ,ऊसतोड मजूर तसेच शालेय गरीब विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देतात . अत्यंत हालाखीची परिस्थिती असेल तर धर्मदाय सेवा ही देत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक ,अपंग सेवक, प्रबोधनकार ,ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांच्या विविध क्षेत्रातील तसेच आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना दलित पॅंथर सन्मानचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यातआला .दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष कालकथित जेष्ठ कवी पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या ७४व्या जयंतीनिमित्ताने  येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ७४कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. ह्याच कार्यक्रमात समर्पित भावनेने कार्य केल्याबद्दल हभप डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना अविनाश महातेकर माजी राज्यमंत्री व केंद्रीय सचिव सरचिटणीस आठवले रिपाई गट, व डॉ. विनायक जी काळे सर अधिष्ठाता ससून हॉस्पिटल पुणे यांचे हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ ,व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीमती कडूबाई खरात, आकाश आप्पा सोनवणे, विठ्ठल दादा गायकवाड, भगवान धेंडे , राहूल खलसे, शैलेंद्र बेल्हेकर, राहूल कहार, कु. सुवर्णा भाऊ नडगम अध्यक्षा महिला आघाडी दलित पॅंथर, दलित पॅंथर चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशवंत भाऊ नडगम ,राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर , रीपाई आठवले गट यांनी केले. हा कार्यक्रम नेताजी सुभाष चंद्र बोस एसी हॉल हडपसर येथे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.