Header Ads

Header ADS

अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर २ दुचाकींना कारची धडक, मुलगा नदीपात्रात पडला, ३ जखमी

 

2-bikers-car-collision-on-Moor-river-bridge-at-Anjale,-boy-fell-into-river,-3-injured

अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर २ दुचाकींना कारची धडक, मुलगा नदीपात्रात पडला, ३ जखमी


 लेवाजगत न्यूज अंजाळे तालुका यावल- गावाजवळील मोर नदीच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला.  भुसावळकडून भरधाव वेगात आलेल्या कारने दोन दुचाकींना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार चौदा वर्षीय मुलगा पुलावरून थेट नदीपात्रात पडला.  तर दोघांसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला,       

          याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.  रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.यावल भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावाजवळ मोर नदीवर पूल आहे.  या पुलावरील वळणावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनचालक कार (क्र. एमएच १९ बीयू ३०८५) घेऊन येत होता.  अरविंद प्रभाकर पाटील (वय ४५)बोरावल खुर्द  हे यावलहून भुसावळकडे दुचाकीने (क्र. एमएच १९ बीके ३२६) दूध विक्रीसाठी जात होते.    त्यांच्या पाठीमागे अंजाळे  (क्र. एमएच १९ बीएस ४०६४) पिंटू शेकोकार व त्यांचा मुलगा सोहम शेकोकार (वय १४) दोघे रा.  अंजाळे जात होते.  या दोन्ही दुचाकींना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली.  जोराची धडक बसल्याने दुचाकीच्या मागे बसलेला सोहम पुलावरून नदीच्या पात्रात पडला.  नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र, अपघातानंतर कार चालक फरार झाला.  नागरिकांनी यावल पोलिसांना माहिती दिली.  अपघाताचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.