Header Ads

Header ADS

धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेला जोशात सुरूवात

Dhanaji-Nana-College-Annual-Sports-Festival-Competition-Starts-With-Enthusiasm


धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेला जोशात सुरूवात

लेवाजगत न्यूज फैजपूर- येथील धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेला जोशात सुरूवात झाली. महाविद्यालयात दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा वर्ग आंतर गत क्रिकेट, बुध्दिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, धनुर्विद्या, भारतलोन, शक्तितोलन आणि मैदानी स्पर्धा या खेळाच्या स्पर्धा विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्या आयोजित करण्यात आल्या आहेत. 

सदरील स्पर्धाच्या उद्घाटन समारंभास संस्थेचे चेअरमन मा. श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी साहेब हे उद्घाटक म्हणून व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. बी. वाघुळदे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे प्र. अधिष्ठाता प्रा. डाॅ. जगदीश पाटील, अधिसभा सदस्य प्रा. डाॅ. पदमाकर पाटील, उपप्राचार्य प्रा. डाॅ. विलास बोरोले, उपप्राचार्य प्रा. डाॅ. शंकर जाधव, जीमखाना समिती चेअरमन प्रा. डाॅ. उदय जगताप, स्नेहसंमेलन चेअरमन प्रा. डाॅ. राजश्री नेमाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी इत्यादी उपस्थितीत होते. उद्घाटन कार्यकमाचे सुत्र संचालन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोविंद मारतळे यांनी केले व अभार प्रदर्शन प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.

उद्घाटन कार्यक्रमात उदघाटक म्हणून संस्थेचे चेअरमन मा. श्री. लिलाधर विश्वनाथ चौधरी साहेब यांनी विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती साठी मैदानावर आलेच पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डाॅ. आर. बी. वाघुळदे सर यांनी खेळाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी बघितले पाहिजे असे सांगितले, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळाच्या विविध स्पर्धेत सहभाग घावा असे अव्हान केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या. 

क्रिकेट साठी आठ संघानी सहभाग घेतला पहिला सामना शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी याच्यात झाला या सामन्यात शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या संघाने १४ रनने विजय  मिळविला, दुसरा सामना कला शाखा विरूद्ध पदवीधर संघ याच्या झाला या सामन्यात पदवीधर संघाने ४६ रनने विजय संपादन केला, तिसरा सामना वाणिज्य शाखा विरूद्ध विज्ञान शाखा याच्यात झाला यात विज्ञान शाखा या संघाने ३३ रनने विजय प्राप्त केला. उद्या दिनांक १७ जानेवारी, २०२४ रोजी टेबल टेनिस व बॅडमिंटन यांचे सामने होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.