Header Ads

Header ADS

चांगले मित्र मिळविण्यासाठी आपणही चांगले असणे गरजेचे - डॉ. एस. टी.भुकान फैजपूर येथे मैत्री शिबीर चे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

To get good-friends-you-need-to-be-good too-Dr-S-T-Bhukan-Faizpur-at-the-inauguration-of-friendship-camp-assertion


चांगले मित्र मिळविण्यासाठी आपणही चांगले असणे गरजेचे - डॉ. एस. टी.भुकान फैजपूर येथे मैत्री शिबीर चे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन 

लेवाजगत न्यूज फैजपूर:- विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैत्री शिबीर चे उद्घाटन डॉ.साहेबराव भुकन,अधिष्ठाता, आंतर शाखीय विद्याशाखा यांच्या हस्ते करण्यात आले .प्रसंगी, डॉ. भुकन यांनी सांगितले की चांगले मित्र मिळविण्यासाठी आपणही चांगले असणे गरजेचे आहे , मैत्री हे जीवनातील एक वेगळ नात आहे त्याची जोपासना केली गेली पाहिजे मैत्रीचे जग हे खूप व्यापक आहे म्हणून निसर्गातील प्रत्येक घटकांशी असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्रसंगी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वघुडदे यांनी ही मैत्रीचे विविध प्रकार सांगत मैत्री ही नेहमी चांगल्या कार्यांना   चांगल्या चरित्रांचा निर्माण करणाऱ्या वृत्तिशी असावी असे सांगितले, तसेच डॉ.एस.एस.पाटील यांनी ही सांगितले की मित्र खरा तीच ज्याच्याशी आपण सर्व वेदना सर्व दुःख सांगू शकू ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण रडू शकू असा कोणीतरी आपला मित्र असला पाहिजे.

      अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे प्रा.एस.के.चौधरी उपाध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, यांनी सांगितले की मैत्री जीवसृष्टी चा श्वास प्राण वायू आहे. समाजाचे प्राण वाचवायचे असतील तर मैत्री भाव जोपासला पाहिजे असे सांगत सर्वांशी बंधुभाव जोपासावा असे सांगितले. दिवसभरात डॉ.प्रतिभा सूर्यवंशी यांनी मैत्री आपल्यातील कौशल्यांशी, डॉ.दयाघन राणे यांनी मैत्री विज्ञान आणि तंत्रज्ञानशी, डॉ.उत्पल चौधरी यांनी मैत्री स्वातंत्र्य सैनिकांशी, तसेच प्रा.शिवाजी मगर,आणि प्रा.प्राजक्ता काचकुटे यांनी मैत्री पूर्ण विविध खेळ या विषयावर मार्गदर्शन केले.  प्रसिध्द लेखक प्रा. व.पू. होले यांचे मैत्री पुस्तकांशी हे व्याख्यान होणार आहे व अस्याच प्रकारे विविध विचारवंतांचे  दोन दिवस दिवसभर व्याख्यान होणार आहे.

अश्या मैत्रीपूर्ण विषयांवर पुढील तीन दिवस चालणाऱ्या या मैत्री शिबीर चे आज उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी व लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करुन करण्यात आले, प्रसंगी मंचावर संस्थेचे सचिव श्री.एम.टी.फिरके प्राचार्य प्रसंगी उप प्राचार्य डॉ.एस. व्ही.जाधव ,डॉ. व्ही.सी. बोरोले आदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे, यांनी केले व आभार डॉ.अचल भोगे यांनी मानले.

सूत्रसंचालन कॅप्टन राजेंद्र राजपूत व प्रा.उन्नती चौधरी, यांनी केले, उद्घाटना नंतर दिवसभर डॉ. प्रतिभा सूर्यवंशी यांनी मैत्री आपल्यातील कौशल्यांशी, या विषयावर मार्गदर्शन केले , प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी मैत्री विज्ञान आणि तंत्रज्ञानशी, प्रा.उत्पल चौधरी यांनी मैत्री स्वातंत्र्यसैनिकांशी, व  प्रा.प्राजक्ता काचकुटे आणि  प्रा.शिवाजी मगर यांनी मैत्री विविध खेळांशी या विषयावर मार्गदर्शन केले सायंकाळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या अशाप्रकारे दिवसभर  मैत्री शिबिराच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले असेच उद्या प्रसिद्ध साहित्यिक व प्रा. व पू. होले यांच्यासह नावाजलेल्या विविध विचारवंतांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे

       कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॅप्टन राजेंद्र राजपूत, प्रा.शुभांगी पाटील प्रा.राकेश तळेले , प्रा.जयश्री पाटील प्रा.सरला तडवी, प्रा.उन्नती चौधरी, कॅप्टन  राजेंद्र राजपूत, प्रा. शेरसिंग पाडवी, प्रकाश भिरुड,अमित गारसे,नितीन सपकाळे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.