Header Ads

Header ADS

सावदा शहरात शुक्रवार रात्री दगडफेक कडेकोट पोलीस बंदोबस्त

 

Sawada-City-Friday night-Stone pelting-Kadekot-Police-Arrangement

सावदा शहरात शुक्रवार रात्री दगडफेक कडेकोट पोलीस बंदोबस्त

लेवाजगत न्यूज सावदा- शहरातील काही भागांमध्ये शुक्रवार रात्री उशीरा जोरदार दोन गटात दगडफेक  आल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  या संदर्भातील वृत्त असे की, काल शुक्रवार रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरात ठिकठिकाणी काही कार्यकर्ते शहर सुशोभीकरणाचे काम करत होते. यात शहरातील बुधवार पेठ, चांदणी चौक आणि गांधी चौक या भागात अचानक अज्ञात लोकांनी जोरदार दगडफेक केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही क्षणातच मोठी धावपळ उडाली.

    घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे प्रांत सौ देवयानी, डीवायएसपी राम शिंदे,रावेर तहसिलदार बंडू कापसे, नायब तहसिलदार संजय तायडे,सपोनि जालींदर पळे, फैजपूरचे सपोनि निलेश वाघ, निंभोरा पोलीस स्थानकाचे सपोनि हरीदास बोचरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तरी शहरातील वातावरण हे रात्री उशीरापर्यंत तणावपूर्ण नियंत्रणात होते.

   दरम्यान, रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सावदा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सावदा येथे रात्रीच अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून शहरात कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.