Header Ads

Header ADS

रामाच्या आदर्शांवर मार्गक्रमण हाच जीवनाचा सार - डॉ. केतकी पाटील विवरे येथील हनुमान मंदिरात सभामंडप उद्‌घाटन

Rama's-ideals-path-this-is-the-essence-of-life-Dr-Ketaki-Patil-Vivere-here-Hanuman- inaugurating-the-sabhamandap-in-the-temple


रामाच्या आदर्शांवर मार्गक्रमण हाच जीवनाचा सार - डॉ. केतकी पाटील

विवरे येथील हनुमान मंदिरात सभामंडप उद्‌घाटन

लेवाजगत न्यूज जळगाव : जननी जन्मभूमिश्च, स्वर्गादपि गरियसी।या उक्तीप्रमाणे प्रभू रामचंद्रांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करणे हाच जीवनाचा सार आहे, आजचा दिवस हा या युगातील सुवर्णमयी असा दिवस आहे, असे विचार गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या औचित्याने विवरे येथील श्री हनुमान मंदिरात सभामंडपाचे उद्घाटन मोठ्या थाटात श्रीमती गोदावरी पाटील आजींच्या हस्ते झाले.या वेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ वर्षा पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील व मान्यवर उपस्थित होते. सभामंडपात आयोजित कार्यक्रमाची दीपप्रज्वलनाने  सुरुवात झाली.प्रमोद भिरुड, रमेश राणे, लीलाधर बेंडाळे, विलास सपकाळ, बिसन सपकाळ, गिरीश बेंडाळे, गोपाळ राणे, मार्तंड भिरुड, विजय पाटील, किशोर पाटील, संजय भिरुड, शिवाजी पाटील, गोपाळ पाटील, राहुल पाचपांडे, आणि विवरेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, महादेव मंदिरात महादेवाची आरती करण्यात आली. तसेच सायंकाळी  विवरे बुद्रुक या गावातून काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेत देखील डॉ केतकी ताई व डॉ वैभव पाटील हे उत्साहाने सहभागी झाले. 

भुसावळ येथील  

श्री राम मंदिरात महाआरती 


भुसावळ : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त भुसावळ शहरातील लक्ष्मीनारायण चौकातील पुरातन श्री राम मंदिरात महाआरती गोदावरी फाउंडेशन संचालिका डॉ. केतकी ताई पाटील व डॉ वैभव पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. सकाळपासून या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दुपारी यज्ञाची पूर्णाहुती  होऊन श्रीरामाची महाआरती करण्यात आली. या वेळी आमदार संजय सावकारे, मनोज बियाणी, पिंटू कोठारी, राधेश्याम लाहोटी, हिम्मतसिंग ठाकूर, शिशिर जावळे, सूर्यभान पाटील, जितेंद्र चिप्पड, किरण महाजन, राजू पारिख ,श्रीमती चौक व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. 


कार्यक्रमांमध्ये सहभाग 

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सर्व भाविकांना  नेत्र सुख प्राप्त व्हावे म्हणून लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. भुसावळ शहरातील  रानातील महादेवाचे मंदिरातही डॉ. केतकी ताई व डॉ. वैभव पाटील यांनी दर्शन घेतले. त्यानंतर श्री श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून स्थानिक महिलांसह लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झाले.

या वेळी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील, प्रसन्न गंधे, विवेक पाटील, अरुण धांडे आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

    गोदावरी पार्क येथे रामलल्लाचे घेतले दर्शन

सोमवारी (ता.२२) अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त भुसावळ शहरातील गोदावरी पार्क येथे डॉ. केतकी पाटील यांनी श्रीराम मंदिरास सदिच्छा भेट देऊन पूजन केले. याप्रसंगी तुषार येवले, सुजय झोपे, कैलास पाटील,  नितीन पाटील, किरण बोडे, योगेश येवले, निलेश येवले, योगेश पाटील, डॉ.पवन सरोदे, अमोल पाटील, उमेश येवले, सुनील कोठे, हेमंत सावकारे, दीपक आमोदकर, दिवाकर भिरूड, प्रभाकर पाटील, राजेश भारुळे, संजय महाजन, संजय टेकाडे, राहुल पाटील, कुशल अग्रवाल, प्रसाद पाटील, अनिल येवले, राहुल तळेले, विनायका कॉलनी, गोदावरी पार्क आणि परिसरातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.