Header Ads

Header ADS

आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आमचा कोळीवाडा नाटकाचे सादरीकरण

Presenting-the-drama-of- Agra-Koli-Culture-Shaping-Our-Koliwada-Drama


आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आमचा कोळीवाडा नाटकाचे सादरीकरण

उरण (सुनिल ठाकूर )उरण भेंडखळ येथील आई एकविरा सांस्कृतिक कला मंच  प्रस्तुत आणि श्रीदत्त माऊली निर्मित आगरी कोळी भाषेतील आमचा कोळीवाडा या धमाल नाटकाच्या दोन अंकी  प्रयोगाचा शुभारंभाचा देखणा प्रयोग लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १३ जानेवारी रोजीच्या जयंतीचे औचित्य साधून,  पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी  ५  वाजण्याच्या सुमारास सादर करण्यात आला. नाट्यप्रयोगाचे उद्घाटन सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी  नाटकाचे निर्माते कलासक्त दत्ता भोईर, न्यायाधीश चंद्रहास मेश्राम, प्राची अत्रे, रामदास संधे, संदीप पाटील, पुंडलिक म्हात्रे, मोहन भोईर, चंद्रकांत मढवी,  जयंत कोषारकर, अरुण  पेधे, उमेश मोरे, सरपंच  कविता संतोष पाटील , संतोष पाटील, निकिता पाटील,  डॉ. अशोक म्हात्रे, सुवर्णा कासवलेकर, अक्षता म्हात्रे आदी जण उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना निर्माते दत्ता भोईर यांनी कोळी टोपी आणि शाल देऊन गौरविण्यात आले. आगरी  कोळ्यांची संस्कृतीची ओळख करून  देणाऱ्या या नाटकात आगरी कोळ्यांच्या ग्रामीण रुढी परंपरांचे दर्शन झाल्याचे रसिकांना पाहायला मिळाले. काळानुसार बदलत चाललेल्या परंपरा आणि आगरी व कोळी बोलीभाषेचा प्रचार व प्रसार टिकवून, ठेवण्याच्या उद्देशाने,  या नाटकाचे लेखन कलासक्त दत्ता भोईर यांनी केले आहे. नाटकात आम्ही  कोळी दर्याचे राजे हाव, वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव, आम्ही हाव जातीचे कोळी, दर्याला आयला तारू वाट बंदरावर बघतोय पारु, रुपेरी वाळू सोनेरी लाटा, देव पावला देव मला मल्हारी, आई माजी कोणाला पावली, आई माजी ऐकोली, ऐकोली अशी ग्रामीण बाजाची आगरी कोळी भाषेतील ग्रामीण नृत्य व गाणी नाटकात सादर करण्यात आली आहेत. लग्नातील आगरी कोळ्यांच्या रूढी परंपरा, करवल्यांची  धावपळ आणि लग्न गीते व  बेभान नृत्याचा वेगळाच देखावा या नाटकातून साकारला गेला होता.आगरी कोळ्यांच्या धंद्यावर परप्रांतीयांचे आक्रमण झाले असल्याची खंत नाट्यातून दिसून आली. त्याचा फटका स्थानिक कोळी बांधवांच्या धंद्याला  बसला असल्याचे निदर्शनास आले. आगरी कोळी बांधव लग्न सोहळ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. तो खर्च न करता केवळ आपल्या रूढी परंपरा अर्थात आपली संस्कृती जोपासून लग्न सोहळे करावेत अशी नाटकातील नवरी मुलगीच आपल्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते. आणि समाज बांधवांचे डोळे उघडतात. असे काळानुसार समाज प्रबोधन करणारे नाटक रसिकांच्या हृदयाला भिडणारे आहे.  कलायात्री निर्माते  दत्ता भोईर यांच्या लेखणीतून हे नाटक लिहिले गेले आहे . नाटकाचे लेखक निर्माते दत्ता भोईर,दिग्दर्शन शैलेश शिंदे यांनी केले आहे .तर  संगीताची बाजू आनंद कुबल यांनी अगदी उत्तम मांडली आहे.  राज आंगणे यांचे नृत्यदिग्दर्शन अगदी साजेसे आहे.  नाटकात , वासुदेव म्हात्रे, दीपक घाग, चेतन पाटील, प्रवीण भावल, आशिष गांवड, परीशा सरोदे, रुचिता म्हात्रे,निकिता पाटील  व कौशिक म्हात्रे आदी रंगनायकांनी  आपल्या अभिनयातून उत्तम भूमिका  साकारल्याआहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.