Header Ads

Header ADS

पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-अजित पवार


Police-department-more-able-to-govern-committed-Ajit-Pawar


पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-अजित पवार

लेवाजगत न्यूज उरुळी कांचन-पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना नेहमी सर्वोत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावावी, उरुळी कांचन गावाची लोकसंख्या लाखाच्या पुढे गेली आहे. स्थानिक नागरिकांची येथे नगरपरिषद व्हावी अशी मागणी होत असून यावर निश्चितच मार्ग काढला जाईल. पुणे-सोलापूर महामार्ग गावातून जात असल्याने वाहतूककोंडी  होत असते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल. गावाच्या विकासाच्यादृष्टीने अनेक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जातील. उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उदघाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरास मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार राहुल कुल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपायुक्त आर. राजा, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पु.जि.म.स.बँकेचे संचालक प्रदिप कंद, सरपंच भाऊसाहेब कांचन, महादेव कांचन, राजाराम कांचन, राजेंद्र कांचन, किर्ती कांचन, हेमलता बडेकर, पु.जि.नि.समिती सदस्य दिलीप वाल्हेकर, अलंकार कांचन, प्रकाश जगताप, संतोष आ. कांचन, नवनाथ काकडे, संतोष ह.कांचन, सागर पो. कांचन, आण्णा महाडीक, सामाजिक कार्यकर्ते डॉ रविंद्र भोळे, सुनिल तुपे,सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग, पंचकृषीतील आजी माजी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेवर कार्यरत असणारे पदाधिकारी, सविविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.