Header Ads

Header ADS

पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ लेवा संगिनी मंच स्नेह मेळावा उत्साहात

Pimpri-Chinchwad-Lewa-Patidar-Sangh-Bhratrimandal-Lewa-Sangini-Manch-Sneh-Melava-Enthusiasm


पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ लेवा संगिनी मंच स्नेह मेळावा उत्साहात

लेवाजगत न्यूज पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रात्रूमंडळ व लेवा संगिनी मंच यांच्यावतीने वार्षिक स्नेह मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात सरदार पटेल लेवा गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री अण्णासाहेब पाटील ,ह भ प डॉ रवींद्र भोळे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष डॉ. मणीभाई देसाई मानव ट्रस्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी विकास  व संचालक जनसेवा शिक्षण संस्था तळणी श्री. अमित भाऊ नाफडे ,सरदार वल्लभाई पटेल संस्थापक अध्यक्ष  श्री. पंकज पाटील सांगवी,उद्योजक श्री .लीलाधर वराडे ,संत आदी शक्ती मुक्ताई देवस्थान चे अध्यक्ष श्री अमोल पाटील ,श्री. हेमंत झोपे समता भातृ मंडळ अध्यक्ष श्री. रवींद्र बरहाटे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व समर्पित भावनेने कार्य केलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना लेवा पाटील गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार व लेवा संगिनी मंच वतीने लेवा पाटील गौरव पुरस्कार २०२४ पुरस्कारांमध्ये गौरविण्यात आलेले  

मा. श्री पुरुषोत्तम निनू पाटील (अण्णासाहेब). उरुळी कांचन येथील ह भ प डॉ रविंद्र भोळे (सामजिक, शैक्षणीक,अध्यात्मिक, अपंगसेवा, धार्मिक कार्ये,),डॉ.श्री निनाद वायकोळे, (सामाजिक कार्ये),श्री अमोल विष्णू पाटील( धार्मिक, सामाजिक कार्ये) सौ.अश्विनी चेतन तळले यांना पुरस्कृत करण्यात आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉक्टर रवींद्र बोडे म्हणाले की पात्रे त्यागी, गुन्हे रागी साविभागीच बंधनतु , शास्त्रे बौद्धा, रन योद्धा, पुरुष हा पंच लक्षणं वरील सुभाषितकाराने वर्णन केलेल्या सुभाषिताचा अर्थ असा होतो की प्रत्येकाने जीवनामध्ये त्या करावा दान करावे, गुणांची कदर करावी गुण ग्रहण करावे, आणि आपले सुखदुःख आपल्या समाजात आपल्या बांधवासमवेत, प्रियजनासमवेत देवानघेवाण करावेत. विविध शास्त्रांच पठण म्हणून ध्यान करून बौद्धिक पातळी वाढवावी, ज्याप्रमाणे योद्धा रणगणांमध्ये आपले कर्तुत्व सिद्ध करतो, सुख दुःखांचा विचार करत नाही त्याचप्रमाणे जीवनामध्ये आपण आपले ध्येय गाठावे, असा एखादा तरी गुणाचा अंगीकार करावा अशा श्रेष्ठ पुरुषांची लक्षणे मनुष्याने आपल्या अंगी धारण करण्याचा प्रयत्न करावा. देशामध्ये राममय वातावरणाने संपूर्ण विश्व संपूर्ण देश राम नामाने एकरूप झालेला अशा या दुग्ध शर्करा योगावर स्वातंत्र्याचा स्वर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्याचे आपणाला भाग्य लाभले, खरोखर आपण सर्व भाग्यवान आहोत, असेही ते म्हणाले.याप्रसंगी पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघाचे अध्यक्ष निना भाऊ खर्चे, उपाध्यक्ष नितीनजी बोंडे, सचिव गजानन लोखंडे, स्वीकृत सदस्य, सर्व सल्लागार मंडळ उपस्थित होते.

   याप्रसंगी लेवा संगिनी मंचाच्या अध्यक्ष सौ किराणताई पाचपांडे, सौ सुनीता इंगळे, सौ रजनी बोंडे,लेवा संगीनी मंच,सौ दिपाली नारखेडे यांचे सर्व सभासद सदस्य उपस्थित होत्या.

   सूत्रसंचालन कुमारी श्रेया देशमुख व  कुमार यश देशमुख ह्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.