Header Ads

Header ADS

न्हावी ग्रामस्थातर्फे नरेंद्र नारखेडे यांचा नागरी सत्कार

 

Nhāvī-grāmasthātarfē-narēndra-nārakhēḍē-yān̄chā-nāgarī-satkāra

न्हावी ग्रामस्थातर्फे नरेंद्र नारखेडे यांचा नागरी सत्कार    

   लेवाजगत न्यूज फैजपूर-यावल तालुक्यातील न्हावी येथे नुकताच राज्यस्तरीय सामूहिक विठ्ठल नामजप महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवात नथुसिंग बाबा दौरा मंडळातील थोर किर्तनकार व महाराष्ट्रातील प्रसिद्धथोर साधू संत यांची उपस्थिती लाभली .महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, गोपाल चैतन्य महाराज, भक्तीकिशोर शास्त्री ,स्वरूपानंद स्वामी यांची उपस्थिती लाभली .या महोत्सवाचे आयोजन व नियोजनात प्रमुख मार्गदर्शक  भूमिका घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिलेबद्दल आयोजन समिती व न्हावी ग्रामस्थांनी फैजपूर येथील डिंगम्बर महाराज वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष तथा विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र विष्णू नारखेडे यांचा महोत्सव समारोप प्रसंगी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.. सत्कार नाथपरंपरेचे अधिपती मोहननाथ महाराज पैठणकर व मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी नथुसिंग बाबा दौरा मंडळाचे कन्हैया महाराज राजपूत, संजय सिंग महाराज राजपूत, उमेश महाराज दशरथे,  दुर्गादास महाराज नेहते, धनराज महाराज अंजाळेकर, आयोजन समितीचे शरद महाजन, नितीन चौधरी, देवेंद्र चोपडे, के जी पाटील, युवराज चोपडे ,हर्षद महाजन ,रामभाऊ पाचपांडे, एम टी फिरके, लक्ष्मण चौधरी, घनश्याम पाटील चिनावलकर,  राजू राणे सुरत, प्रभाकर अप्पा सोनवणे  यांचेसह हजारो नच्या संख्येने भाविक उपस्थित होते सूत्र संचालन किरण पाटील सर यांनी केले. आभार माजी जिप सदस्य शरद महाजन यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.