Header Ads

Header ADS

मोठी दुर्घटना! शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली, दोन शिक्षकांसह १२ मुलांचा मृत्यू

 

Major-accident-boat-full-of-school-students-overturned-along-with-two-teachers-12-children-died

मोठी दुर्घटना! शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली, दोन शिक्षकांसह १२ मुलांचा मृत्यू

वृत्त संस्था वडोदरा-गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदऱ्यातील हर्णी तलावात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली आहे. या घटनेत दोन शिक्षक, १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोधमोहीम सुरू आहे.

    २७ विद्यार्थ्यांची सहल हर्णी तलावात बोटिंगसाठी आली होती. बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली. यात बोटमधील २७ जण तलावात पडले. यामध्ये दोन शिक्षक, १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

  याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. अग्निशमन दलाकडून तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.

वडोदरा अग्निशमन दलाचे अधिकारी पार्थ ब्रह्मभट्ट ‘पीटीआय’ला संवाद साधताना म्हणाले, “शालेय विद्यार्थींची सहल बोटींगसाठी दुपारी हर्णी तलावात आली होती. पण, विद्यार्थ्यांसह ही बोट तलावात उलटली. अग्निशमन दलानं सात विद्यार्थ्यांना वाचवलं आहे. बेपत्ता विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू आहे.”

   वडोदरा येथील आजवा रोडवर राहणाऱ्या नॅन्सी या ८ वर्षीय मुलीची आई निरालीबेन माची यांनी सांगितले की, इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीसह सर्व मुले सकाळी ८ वाजता हरणी वॉटर पार्क आणि तलाव येथे पिकनिकसाठी गेली होती.

    एका मुलीची आई रडत रडत म्हणाली - मी ५ वाजता फोन केला होता. मॅडम म्हणतात अपघात झाला आहे, जान्हवी हॉस्पिटलमध्ये आहे. मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. आम्ही दीड तास वाट पाहत होतो.

    गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “ही घटना अत्यंत दु:खद आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन शक्ती मिळो. या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असं ऋषिकेश पटेल यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.