Header Ads

Header ADS

'लेवा महिला झंकार' म्हणजे भारतीय संस्कृतीचे उत्तुंग दर्शन-डॉ.सौ.केतकी पाटील

 

'लेवा महिला झंकार' म्हणजे भारतीय संस्कृतीचे उत्तुंग दर्शन-डॉ.सौ.केतकी पाटील

'लेवा महिला झंकार' म्हणजे भारतीय संस्कृतीचे उत्तुंग दर्शन-डॉ.सौ.केतकी पाटील

लेवाजगत न्यूज  नाशिक -येथे लेवा समाज कल्याण (मध्यवर्ती ) मंडळ, नाशिक व विभागीय मंडळ नाशिक तर्फे 'लेवा झंकार महिला ग्रुप' बाल, तरूण, ज्येष्ठांतील कला गुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी नृत्य,गायन,वादन आणि फॅशन शोचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमास डॉ.सौ.केतकी पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. 



     हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे लेवा पाटीदार समाजाच्या सांस्कृतिक परिपक्वतेचा नजराणाच होता. बालगोपाल, तरुण- तरुणी, ज्येष्ठांनी आपल्या कलागुणांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.

हा कार्यक्रम नाशिक येथील लेवा समाज अध्यक्ष संजय  वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी डॉ.सौ.केतकी पाटीलयांचे सह व्यासपीठावर लेवा समाज अध्यक्ष संजय दादा वायकोळे, मंडळ सचिव अनिल महाजन, नाशिक रोड अध्यक्ष सुरेश जावळे,अरविंद अत्तरदे, राजेंद्र महाजन, रवींद्र झोपे,प्रेरणा बेले,अभिनेत्री पूनम चौधरी, मनीषा पाटील,नीता वायकोळे, देवेंद्र राणे, रवी महाजन, दिगंबर धांडे,डी.डी.पाटील,रमेश झांबरे, मनोज अत्तरदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मनीषा कोलते, भावना सरोदे, प्रिया लोखंडे, सुरेखा महाजन यांनी अतिशय सुंदरपणे जबाबदारी पार पाडली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा चौधरी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.