Header Ads

Header ADS

कोचुरच्या राणी परदेशीला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

Kochur's-Rani-Foreign-Gold-Medal-in-National-Competition


कोचुरच्या राणी परदेशी ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक 

लेवाजगत न्यूज सावदा-रायपूर छत्तीसगड येथे राष्ट्रीय वेस्ट झोन पावर लिफ्टिंग स्पर्धेत ४४किलो वजनी गटातकोचुर तालुका रावेर येथील राणी परदेशी हिने सुवर्णपदक पटकावले आहे.रविवार दिनांक १४ जानेवारी ला या स्पर्धा रायपूर छत्तीसगड येथे झाल्या.

    रायपूर छत्तीसगड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय वेस्ट झोन पावर लिफ्टिंग स्पर्धेत श्रीस्वामीनारायण स्पोर्ट क्लब सावदा ची खेळाडू राणी सुदाम परदेशी हिने ४४ किलो वजनी गटात एकूण १४७.५ किलो वजन उचलून  सब ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

सदरील खेळाडू ही  कोचूर  तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून या खेळाडूचे तिच्या या यशाबद्दल सर्व गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या खेळाडूला  श्री स्वामीनारायण गुरुकुल सावदा येथील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक पंकज महाजन  यांचे मार्गदर्शन लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.