Header Ads

Header ADS

खोपटे येथे प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

Khōpaṭē-yēthē-prabhu-śrīrāmān̄cyā-prāṇapratiṣṭhā-sōhaḷā-nimittānē-vivi-kāryakramān̄cē-āyōjana

खोपटे येथे प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

लेवाजगत न्यूज उरण(सुनिल ठाकूर ). अखंड हिंदुस्थानात नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदूंच्या हृदयातील श्रद्धास्थान भगवान प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या येथील नवीन बांधलेल्या मंदिरात २२जानेवारी या शुभमुहूर्तावर  प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावाने ,थाटामाटात आणि भव्य-दिव्य स्वरूपात संपन्न झाला.

खरंतर प्रत्येक हिंदूला ही अभिमानाची गोष्ट आहे , जगातील प्रत्येक स्तरातील लोकांनी या बाबत कौतुक केले आहे, भारतातील प्रत्येक शहर प्रत्येक गावाने  मोठ्या श्रद्धा भावनेने व आनंदाने अतिउत्साहाने  हा सर्वात मोठा सण समजून उत्सव साजरा केला.

उरण तालुक्यातील खोपटे हे सर्वात मोठे गाव  असुनही सर्व गावातील ग्रामस्थांनी कोणताही वादविवाद न करता अगदी एकजूट होऊन मोठ्या भक्ती भावाने आणि जल्लोषात हा सोहळा संपन्न केला.

सोहळ्याच्या  अगोदरच   गावात प्रभू श्री रामांची शोभायात्रा काढली .

 गावातील प्रत्येक लहान थोर व्यक्तीने हा मोठा सण समजून साजरा केला. दोन दिवस अगोदर प्रत्येक रस्ता घर स्वच्छ करून घरासमोर रांगोल्या काढल्या संध्याकाळी दिप प्रज्वलीत केले आणि त्यामुळे संपूर्ण गाव श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या सुगंधाने दरवळून गेले.

 संपूर्ण दिवस भक्तिमय होऊन गेला. सकाळी मंदिरातील राममूर्तीचा अभिषेक व पूजन झाले. त्यानंतर गुढीउभारणी, करण्यात आली. मंदिरातील महाआरतीस हजारो ग्रामस्थ उपस्थित होते . तसेच हरिपाठ वाचन पठण, रानिश्वरी वाचन कार्यक्रम झाले. सायंकाळी 7.00 वाजता 'दीपोत्सव" कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी हजारों दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला. रात्रौ कराओके- रामगीतांचा कार्यक्रम व रामगीते - भक्तिसंगीत कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी अत्यंत उत्साहाने सर्व ग्रामस्थ सहभागी झाले. प्रसाद म्हणून प्रत्येक घरी लाडू चे वाटप करण्यात आले. व आयोध्या येथुन प्राप्त अक्षतांचे प्रत्येक घरी पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने व एकोप्याने एकच आले. या कार्यक्रमात उल्लेखित योगदान श्री. प्रदिप ठाकूर. (सामाजिक कार्यकर्ता, बी. जे. पी). श्री प्रशांत ठाकूर (सामाजिक कार्यकर्ता,) सौ. विशाखा ठाकूर (सरपंच,),श्री निलेश भगत, (अध्यक्ष खोपटे,). नवनाथ ठाकूर(अध्यक्ष भाजप खोपटे,). विश्वास पाटील (उद्‌योजक खोपटे), राजेंद्र म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ता ),अलंकार पाटील (उपाध्यक्ष), कुमार ठाकूर, हसुराम घरत, प्रतिक ठाकूर , संतोष पाटील, अनंत ठाकूर (सामाजिक कार्यकर्ता )व सर्व ग्रामस्थ मंडळ तथा ग्रामपंचायात बांधपाडा खोपटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.