Header Ads

Header ADS

माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे अपघातातून थोडक्यात बचावले

माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे अपघातातून थोडक्यात बचावले


माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे अपघातातून थोडक्यात बचावले

लेवाजगत न्यूज सावदा- येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे हे अपघातातून थोडक्यात बचावले आहे चाळीसगाव येथून कथाकार  प्रदीप मिश्रा यांचे  शिवपुराण कथेचे श्रवण करून घरी परतत असताना भडगाव येथील वळण रस्त्यावर त्यांच्या एम.एच.१९ इ.ए. ४५३१ गाडीला अपघात झाला. या अपघातातून वानखेडे बाल बाल बचावले असल्याची माहिती बंटी जंगले यांनी दिली आहे. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून ते वाचले आहेत प्रत्यक्ष दर्शी च्या माहितीनुसार त्यांच्या गाडीने दोन ते तीन उलट्या घेतल्या. वानखेडे यांना उपचारासाठी जळगाव येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले होते.  त्यांना किरकोळ जखमा झाल्या व मुका मार लागला असून प्राथमिक उपचार करून ते घरी पोहचले असून आराम करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टर यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.