Header Ads

Header ADS

अखेर माजी खासदार डॉ. उल्हासदादा व डॉ. केतकी पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

Finally-former-Khasdar-Dr-Ulhasdada-and-Dr-Ketaki-Patil-enter-BJP

अखेर  माजी खासदार डॉ. उल्हासदादा व डॉ. केतकी पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

लेवाजगत न्यूज सावदा- गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकीताई पाटील या आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.मुंबई येथे आज दुपारी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे,मंत्री गिरीश महाजन ,जिल्हा प्रमुख अमोल जावळे हा कार्यक्रम पार पडला.



     डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील ,देवेंद्र मराठे, यांचे कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. यानंतर डॉ. उल्हासदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर टिकास्त्र सोडले होते. याप्रसंगी त्यांनी स्पष्टपणे आपली कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

या अनुषंगाने आज बुधवार रोजी मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला. यात डॉ. उल्हासदादा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, देवेंद्र मराठे,शैलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन आदी नेत्यांनी यांचे स्वागत केले.

   डॉ. उल्हासदादा पाटील हे समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे आधीच कमकुवत असणार्‍या कॉंग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. तसेच यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद ही अजून वाढणार असल्याचे मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.