Header Ads

Header ADS

फैजपूर येथीलधनाजी नाना महाविद्यालयात 'धनोत्सवा'स प्रारंभ

 

Faizpur-Dhanaji-Nana-College-Starts-with-Dhanotsav

फैजपूर येथीलधनाजी नाना महाविद्यालयात 'धनोत्सवा'स प्रारंभ

लेवाजगत न्यूज फैजपूर: येथील धनाजी नाना महाविद्यालय च्या प्रांगणात पुढील २३ते२५जानेवारी असे तीन दिवस विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव 'धनोत्सव' ची सुरुवात झाली आहे त्यानिमित्ताने आज दिनांक २३ रोजी रांगोळी स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला स्पर्धेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक पोशाख परिधान करून भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, रांगोळी स्पर्धेत देशभक्ती, राम मंदिर राजनीतिक, सांस्कृतिक, सामाजिक, असे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा रांगोळ्या काढल्या तसेच वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेले विषय अतिशय ज्वलंत होते त्यात आजची तरुण पिढी, भारतासमोरील आव्हाने, तसेच विकसित भारत या विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय अचूकपणे संदर्भ देत परखडपणे आपली मते मांडली तसेच मेहंदी स्पर्धेत सुद्धा विद्यार्थी व विद्यार्थिनीनी चांगल्या प्रकारे कलाकृतीचे दर्शन घडविले 

सर्व स्पर्धांमध्ये विजयी प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे, सर्व स्पर्धासाठी महाविद्यालयातील विविध समिती प्रमुख यांनी मेहनत घेतली परीक्षक म्हणून प्रा.विजय सोनजे, प्रा. राजेंद्र राजपूत प्राध्यापक, कल्पना पाटील यांनी काम पाहिले.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर.बी. वघुळदे यांनी या सर्व कला प्रकारांच्या मंचावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या प्रसंगी  उपप्राचार्य डॉ.व्ही.सी. बोरोले, डॉ.एस.व्ही. जाधव, स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा. डॉ. राजश्री नेमाडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.