Header Ads

Header ADS

जनआरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ मिळवून देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालय जिल्हयात प्रथम- पालकमंत्र्यांच्या हस्ते अधिष्ठातांसह टीमचा गौरव

 

Dr-Ulhas-Patil-Medical-Hospital-in-the-District-with-the-hands-of-the-first-Palak-Minister-with-superiors-team-proud-by-getting-the-benefits-of-the-patients-of-the-public-health-scheme

जनआरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ मिळवून देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालय जिल्हयात प्रथम-

पालकमंत्र्यांच्या हस्ते अधिष्ठातांसह टीमचा गौरव

लेवाजगत न्यूज जळगाव — महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या वर्षी जास्तीत जास्त रूग्णांना लाभ मिळवून देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व  रुग्णालयाने जिल्हयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके  यांच्यासह रुग्णालयाच्या टीमने हा पुरस्कार स्वीकारला.प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ.  सुभाष बडगुजर,योजना प्रमुख वैशाली नेमाने,रंजना महाजन यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. वर्षभरात एकूण च्या वर  रुग्णांना या योजनेअंतर्गत विनामूल्य शस्त्रक्रिया आणि उपचार रुग्णालयात करण्यात आलेले आहेत.या योजनेच्या यशस्वितेसाठी अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके  यांच्या नेतृत्वाखाली  वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित,डॉ. सुभाष बडगुजर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड  व योजना प्रमुख वैशाली नेमाने  यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे नोडल अधिकारी रंजना महाजन , रुग्णालयातील सर्व विभागप्रमुख,वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नाने रुग्णांवर विनामूल्य उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

    अस्थिरोग, नवजात बालकांवर उपचार, मेंदू विकारावरील शस्त्रक्रिया जळीत रुग्णांवरील उपचार या विभागामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनामध्ये रुग्ण समाविष्ट करून त्यांना नि:शुल्क लाभ देण्यात आला. यापुढेही जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यासाठी  रुग्णालय प्रयत्नशील असतील.- डॉ. प्रशांत सोळंके, अधिष्ठाता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.