Header Ads

Header ADS

केतकी पाटील यांची भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Appointment of Ketki Patil as Vice-President of Women's Region of BJP


केतकी पाटील यांची भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

लेवाजगत न्यूज मुबई दि २४— डॉ. केतकी पाटील यांची महिला प्रदेश उपाध्यपदी नियुक्तीची घोषणाजळगाव - काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, कन्या डॉ. केतकी पाटील, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे,गोदावरी फाउंडेशन चे उपाध्यक्ष सुभाष पाटील डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर अनिकेत पाटील,  डॉक्टर अक्षता पाटील यांचीही उपस्थिती होती. यांच्यासह शेकडो कार्यर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.मुंबई येथील प्रदेश भाजपा कार्यालयात हा प्रवेशसोहळा पार पडला. या सोहळ्याला भाजपाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी, माजी मंत्री जयकुमार रावल, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेर विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, नंदू महाजन यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. केतकी पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाची मफलर गळ्यात टाकून डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिला.डॉ. केतकी पाटील यांच्या नियुक्तीची घोषणाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील यांच्यासह पदाधिकार्यांचे भाजपात स्वागत केले. बावनकुळे म्हणाले की, डॉ. उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाचे संघटन आणखी मजबूत होणार आहे. तसेच डॉ. केतकी पाटील यांनी सुरूवातीपासून अंत्योदय हा घटक डोळ्यासमोर ठेऊन सुरू केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. केतकी पाटील यांची भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.