Header Ads

Header ADS

अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन सरस्वती शाळेत साजरा

Amrit-Mahotsavi-Republic-Day-Saraswati-Celebration-in-school


अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन सरस्वती शाळेत साजरा

लेवाजगत न्यूज उरुळी कांचन: नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचालित सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथे अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षजेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे उपाध्यक्ष सरस्वती शाळा हे होते. याप्रसंगी श्रीमती रुकसाना आतार मॅडम वरिष्ठ अधिकारी बँक ऑफ इंडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिरीष तोडकरी सेवानिवृत्त प्राध्यापक, सौ छाया पाटोळे सामाजिक कार्यकर्त्या, सौ भारतीताई गोते अध्यक्ष महिला दक्षता समिती उरळीकांचन  व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रभात फेरी, पाहुण्यांच्या आगमन, ध्वजारोहण, साधन कवायत, विद्यार्थी भाषणे, देशभक्तीपर गीते,  मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर तसेच अध्यक्षांचे भाषण झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.रवींद्र भोळे म्हणाले की  आपला देश इंडिपेंडन्स नेशन डे इन ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्य झालेला देश इंडिया असे नाव आपल्या देशाला ठेवण्यात आले होते. व आपला सुसंस्कृत महान वारसा समाप्त करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज खऱ्या अर्थाने श्रीराम प्रभू च्या मूर्तीची प्रतिष्ठापना  अयोध्या मध्ये झालेली आहे. म्हणून या सुवर्ण महोत्सवी प्रजासत्ताक दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आले असून खऱ्या अर्थाने हा देश हिंदुस्तान किंवा भारत झाला आहे असे वाटते. व खरी राम राज्याची सुरुवात झालेली आहे. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र भोळे पुढे म्हणाले कीअमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही माझे परमभाग्य आहे तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण करीत असताना व्यसनमुक्त राहून थोरामोठ्यांची चरित्रे वाचून आपला महान सांस्कृतिक वारसा जोपासावा .हयाप्रसंगी विद्यार्थ्यांना सौ छाया पाटोळे, पोलीस अधिकारी श्री चांदणे साहेब, श्रीमती रुकसाना आतार मॅडम, राजाभाऊ बारंगुळे यांचे वतीने खाऊची व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी शाळेकरीता सौ छाया पाटोळे यांनी दहा खुर्च्या,  श्री गिरीश तोडकरी सर यांनी दहा बस्कर पट्ट्या, अविनाश वीभुते यांनी स्किन  स्क्रीन प्रोजेक्टर, तसेच चि हृदय सुभाष गोते यांनी दहा बस्कर पट्ट्या अशाप्रकारे वरील साहित्य शाळेला देण्यात आले. मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर यांनी प्रमूख पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री संजय कुंजीर सर यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचप्रमाणे पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.