Header Ads

Header ADS

रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून ५० वर्षीय वृद्धाचा खून, पतीपत्नी गंभीर जखमी

50-year-old-old-man-killed-in-Ridhuri-in-a-road-dispute,- husband-wife-seriously-injured


रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून  ५० वर्षीय वृद्धाचा खून, पतीपत्नी गंभीर जखमी

लेवाजगत न्यूज यावल-तालुक्यातील रिधुरी गावात सोमवारी (दि. १५) रात्री घराच्या वापराच्या रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबात मारामारी झाली.  त्यात ५० वर्षीय  एका प्रौढ व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला.  या हाणामारीत एक जोडपे गंभीर जखमी झाले.  

       रिधुरी गावात सोमवारी रात्री ८.३० वाजता घराच्या वापराच्या  रस्त्यावरून  दोन कुटुंबांमध्ये वाद झाला.  त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन धनराज वासुदेव सोनवणे (वय ५०) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्यात आले.  यात धनराज सोनवणे जागीच ठार झाले.  सतीश सुखदेव सोनवणे (वय ३०), आरती सतीश सोनवणे (वय २८) हे जखमी झाले.  यावल येथे प्राथमिक उपचार करून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.