Header Ads

Header ADS

अपघातात जखमी सातोद येथील २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

26-year-old-man-injured-in-accident-died-during-treatment


अपघातात जखमी सातोद येथील २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

लेवाजगत न्यूज यावल :- तालुक्यातील सातोद येथील रहिवाशी २६ वर्षीय तरुणाचा छत्रपती संभाजी नगर ते पुणे रस्त्यावरून दुचाकी व्दारे जात असतांना अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. तेव्हा उपचारादरम्यान या तरुणाचा रविवारी पहाटेपूर्वी त्यांचा मृत्यू झाला कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अशा अपघाती मृत्यू मुळे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

सातोद ता. यावल येथील रहिवाशी जयराज प्रशांत महाजन वय २६ हा तरुण पुणे येथे ग्राफिक्स डिझायनर म्हणून आयटी क्षेत्रात कार्यरत होता. दरम्यान तो कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आला होता व दिनांक १६ जानेवारी रोजी तो दुचाकीद्वारे पुणे येथे जाण्यासाठी निघाला होता. तेव्हा त्याचा दुचाकीचा छत्रपती संभाजी नगराच्या बाहेर पुणे रोडावर अपघात घडला आणि यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी पहाटे पूर्वी त्याचा मृत्यू झाला. आपल्या कुटुंबात एकुलत्या एक या तरुणाचा अशा अपघाती मृत्यूमुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जयपाल हा सातोद येथील प्रशांत दिनकर महाजन यांचा मुलगा होता त्याच्यावर  सातोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.