Header Ads

Header ADS

सुटीच्या दिवशी लाचखोरी : सहायक बीडीओसह विस्तार अधिकारी जाळ्यात !


 सुटीच्या दिवशी लाचखोरी : सहायक बीडीओसह विस्तार अधिकारी जाळ्यात !


लेवाजगत न्यूज जळगाव- सुटीच्या दिवशी देखील कार्यालयात येऊन पाच लाखांची लाच स्वीकारणार्‍या सहायक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.(lewajagat news)

जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती.(jalgaon)

 या चौकशीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.

    या तक्रारीनुसार आज पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३) या पंचायत समितीतील दोन्ही अधिकार्‍यांनी तक्रारदाराला बोलावले होते. येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले. यामुळे सुटीच्या दिवशी लाच घेणे या दोघांना महाग पडल्याचे दिसून आले आहे.


आजची कारवाई ही हा सापळा जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.