Header Ads

Header ADS

सावदा भाजपकडून आमदार एकनाथ खडसे यांचा निषेध दुर्गामाता चौकात कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी

 

Sawada-BJP-MLA-Eknath-Khadse-banned-by-activists-made-proclamations-at-Durgamata-chowk

सावदा भाजपकडून आमदार एकनाथ खडसे यांचा निषेध

दुर्गामाता चौकात कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी

लेवाजगत न्यूज सावदा-राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा सावदा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. शहरातील बसस्थानकासमोर दुर्गामाता चौकात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी ११ वाजता हे आंदोलन झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,शिवाजी पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, जे. के. भारंबे, मिलिंद वायकोळे, गजानन भार्गव, अक्षय सरोदे, बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका सारिका चव्हाण यांच्यासह कार्यकतें उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ व  पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. राष्ट्रवादीचे नेते जाणीवपूर्वक व वारंवार मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करतात. त्याचा कार्यकत्यांनी जोरदार घोषणा देत निषेध केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.